Kareena Kapoor Khan Delivery: अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या घरी कुठल्याही क्षणी गुडन्यूज येऊ शकते. करिना आणि सैफच्या घरी कुठल्याही क्षणी दुसऱ्या बाळाचा जन्म होऊ शकतो, अशी माहिती आहे. त्यांच्या घरी जवळच्या लोकांचं येणं जाणं वाढलं आहे. आज करिनाची आई बबिता कपूर आणि बहिण करिश्मा कपूर सकाळीच करिनाच्या घरी पोहोचल्या. त्यांनी करिनाच्या प्रकृतीची विचारपूस केली.


पॅपराजी विरल भयानी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात करिनाची आई बबिता कपूर आणि करिश्मा दिसत आहेत. बबिता यांना चालायला अडचणी येत असल्याने नर्स आण करिश्माची मदत घेताना दिसून आल्या.


दरम्यान सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान, सोहा अली खान देखील करिनाच्या घरी पोहोचले आहेत. करिना कपूरला 15 फेब्रुवारी ही डिलिव्हरी डेट दिली होती. अनेक सेलिब्रिटी किड्सप्रमाणंच करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला आहे. इतकंच नव्हे, तर बाळाचं नाव, नवी ओळख, नावामागचं कारण अशा अनेक चर्चांना आतापासूनच उधाण येण्यास सुरुवात झाली आहे.


बाळाच्या जन्मानंतर सैफ अली खान सुट्टीवर जाणार


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता सैफ अली खान यानं त्याच्या आगामी चित्रपट, सीरिज आणि चित्रीकरणाच्या सर्व कामांतून सुट्टी घेण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. आपल्या नवजात बाळासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला सैफ दरम्यानच्या काळात प्राधान्य देणार आहे.


मातृत्त्वाचा अवुभव घेणारी करीना ही तिच्या गरोदरपणाच्या काळात अनोख्या स्टाईल स्टेटमेंटमुळं चर्चेत आहे. मैत्रीणींसमवेत वेळ व्यतीत करण्यापासून ती या काळात कुटुंबासोबतच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होती. त्यामुळं करीना एका वेगळ्याच अंदाजात चाहत्यांची मनंही जिंकत होती.