Karan Singh Grover : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांनी नुकतीच चाहत्यांना गूड-न्यूज दिली आहे. बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एक चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. बिपाशानं तिचं बेबी बंप फ्लॉन्ट करत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच करण सिंह ग्रोवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी करणला ट्रोल केलं आहे. 


व्हायरल व्हिडीओमध्ये करण हा एका फूड मॅलमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यानंतर फोटोग्राफर्स हे करणचे फोटो काढतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही लहान गरीब मुलं करणकडे पैसे मागण्यासाठी येतात पण करण त्यांना पैसे देत नाही. त्यामुळे करणला नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


काही नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन करणला ट्रोल केले. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'करण म्हणत असेल की माझ्याकडेच पैसे नाहीत. तुम्हाला कुठून देऊ. ' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'त्याच्याकडे पैसे नसतील, तो स्वतः बिपाशाच्या भरवशावर जगत आहे.'


पाहा व्हिडीओ:






बिपाशा आणि करणची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. आता लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा होणार आहेत. धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं कुबूल है, दिल मिल गए, दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: