Karan Johar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) याचा  ‘जुग-जुग जियो’ (Jug Jug Jiyo) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंग काल पार पडला. या इव्हेंट दरम्यान करणला  दाक्षिणात्य चित्रपटांबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही. त्यामध्ये जर्सी, रनवे 34 आणि हिरोपंती2  या चित्रपटांचा समावेश होतो. पण पुष्पा, आरआरआर, केजीएफ चॅप्टर 2  या चित्रपटांनी मात्र बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याबाबत करणनं मुलाखतीमध्ये सांगितलं. 


दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. याबाबत करण म्हणाला, 'दाक्षिणात्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आम्हाला शिकवलं की सिनेमाचा स्टँडर्ड हा किती उच्च असला पाहिजे.' तसेच करणनं गंगूबाई काठियावाडी आणि भूल भूलैय्या2 या चित्रपटांचे देखील कौतुक केलं.


पुढे करण म्हणाला, 'आम्ही अभिमानानं सांगतो की, आम्ही भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग आहोत.' त्यानंतर करणला प्रश्न विचारण्यात आला की, 'दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड यांच्यामध्ये स्पर्धा आहे का?' या प्रश्नाला करणनं उत्तर दिलं, 'नाही, आमच्यामध्ये स्पर्धा नाही आम्ही एकत्र प्रगती करत आहोत.' त्याच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.


नीतू कपूर आणि अनिल कपूर हे ‘जुग-जुग जियो’ या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.  ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 


संबंधित बातम्या