Kapil Sharma : दोन चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर कपिल शर्मा (Kapil Sharma) आता पुन्हा चित्रपटात एण्ट्री करणार आहे. त्याने नुकतीच आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कपिल शर्मा ‘फूड डिलिव्हरी बॉय’च्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल शर्माने पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे.


‘अप्लॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्स वर्षातील सर्वात रोमांचक प्रकल्प सादर करणार आहेत. लेखक-दिग्दर्शक-निर्मात्या नंदिता दास यांनी कपिल शर्मासोबत... यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार दाखवण्यासाठी.. एकत्र काम करण्यासाठी... कपिलसोबत शहाना गोस्वामी फिमेल लीड म्हणून यात सामील होणार आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.



कपिल शर्मा त्याच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल खूप खूश आहे. नंदिता दासच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळत असल्याने मी आनंदी आहे, असे तो म्हणाला. या चित्रपटात कपिल शर्मा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. कपिल शर्मा त्याच्या नवीन चित्रपटात फूड डिलिव्हरी रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल शर्मासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी दिसणार आहे. या चित्रपटात शाहाना कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. 


कधी सुरू होणार शूटिंग?


मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचे शूटिंग मार्चमध्ये सुरू होईल, त्यासाठी कलाकार भुवनेश्वर, ओडिशा येथे जाणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. कपिल शर्माच्या करिअरबद्दल बोलायचे झाले, तर कपिल पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ व्यतिरिक्त, त्याने नेटफ्लिक्सवर ‘I am not done yet’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणळा आहे आणि आता त्याने त्याच्या तिसऱ्या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे. याआधी कपिल शर्मा दोन चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha