Continues below advertisement


Kantara Chapter 1 on OTT: ऋषभ शेट्टीच्या अभिनय आणि दिग्दर्शनात साकारलेली ‘कांतारा चॅप्टर 1’ ही ब्लॉकबस्टर फिल्म गांधी जयंती आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 2 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाली होती. या चित्रपटाचा सामना वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’शी झाला होता. मात्र, ‘कांतारा चॅप्टर 1’ने या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अक्षरशः नामोहरम केलं. (Kantara Chapter 1) आता ही सुपरहिट फिल्म ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या स्ट्रीमिंगची तारीख आणि प्लॅटफॉर्म दोन्हीही जाहीर झाले आहेत.


31 ऑक्टोबरला प्राईम व्हिडिओवर ओटीटी प्रीमियर


कांतारा चॅप्टर 1’ कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये थिएटर्समध्ये रिलीज झाली होती. आता ही फिल्म 31 ऑक्टोबरपासून Amazon Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे, पण सुरुवातीला फक्त चार भाषांमध्येच प्रदर्शित होईल. हिंदी आवृत्तीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.


ऋषभ शेट्टी काय म्हणाला?


“‘कांतारा: अ लिजेंड चॅप्टर 1’ ही आपल्या मातीशी जोडलेली कथा आहे. ती माणूस, निसर्ग आणि श्रद्धा यांच्यातील नात्याचा उत्सव साजरा करणारीय. मी जेंव्हा या प्रीक्वलवर काम करायला सुरुवात केली त्यावेळी मी या जगाच्या मुळांकडे परतण्याचा प्रयत्न केला होता. प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट, या गोष्टीचा आत्मा आणि यातील रहस्य जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार याचा मला आनंद आहे.”


'कांतारा चॅप्टर 1'मध्ये 5,000 वर्षांहून अधिक काळाच्या आणि जवळजवळ विसरलेल्या दंतकथांवर आधारित एक अनोखी कथा होती. दरम्यान, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं स्थानिक प्रामाणिकपणाला प्राधान्य दिलं, देशभरातील आजींच्या लोककथांमध्ये हरवलेली एक उल्लेखनीय कथा घेतली आणि बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.


विक्की कौशलच्याछावा’लाही मागे टाकलं


कांतारा चॅप्टर 1’ने जगभरात तब्बल 813 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कमाईसह तिने विक्की कौशलच्याछावा’लाही मागे टाकत 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी भारतीय फिल्म ठरली आहे. भारतातच या चित्रपटाने 589 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसह रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम आणि प्रकाश थुमिनाद हे कलाकार झळकले आहेत.