Nilesh Sable In Vahinisaheb Superstar Show: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. त्यानंतर या मराठमोळ्या कार्यक्रमाचं (Marathi Show) नवं पर्व, 26 जुलैपासून झी मराठीवर (Zee Marathi) सुरू झालं पण, नव्या बदलांसह... 'चला हवा येऊ द्या'ची संपूर्ण टीम या नव्या पर्वात दिसली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, निलेश साबळे आणि भाऊ कदम ही प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तीमत्त्व नव्या पर्वात नाहीत. नव्या पर्वाची घोषणा होताच, हे दोघे का नाहीत? यावरुन बराच गदारोळ झालेला. त्यावेळी आम्ही वेगळ्या कामांमध्ये बिझी आहोत, असं उत्तम दोघांकडूनही देण्यात आलं. त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले. पण, अशातच आता गूड न्यूज म्हणजे, महाराष्ट्राचा लाडका आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सूत्रसंचालक निलेश साबळे आता आपल्या नव्या कार्यक्रमासह प्रेक्षांना भेटायला येतोय. 

Continues below advertisement

'चला हवा येऊ द्या'च्या यंदाच्या पर्वात शोचा कर्ताधर्ता आणि पहिल्यापासून या कार्यक्रमाची घडी ज्यानं बसवली, तो डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sabale) नव्या पर्वात दिसणार नसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झालेला, पण आता निलेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. 

निलेश साबळे घेऊन येतोय... 'वहिनीसाहेब सुपरस्टार'

निलेशनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केली आहे. या पोस्टरवर निलेशचा फोटो दिसत आहे. तसेच त्यावर 'वहिनीसाहेब सुपरस्टार' असं लिहिलं आहे. धमाल खेळ, गप्पा, कॉमेडी, संगीत आणि बरंच काही असं लिहिलंय. 'वहिनीसाहेब सुपरस्टार' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश करणार असून, या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Continues below advertisement

निलेश साबळेनं पोस्ट शेअर करताना, "महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो...", असं कॅप्शन दिलं आहे. निलेशची ही पोस्ट पाहून प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच, निलेशच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्याला नव्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, कार्यक्रम नक्की काय असणार? कोणत्या वाहिनीवर प्रसारित होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashish Chanchlani Directorial Debut Ekaki Official Trailer Released: '7 मित्र... वीकेंड अन् महाराष्ट्रातलं एक सुनसान गावं...'; अंगावर काटा आणतो आशीष चंचलानीच्या 'एकाकी'चा ट्रेलर, पाहिलात?