Kantara Chapter 1 Box Office Collection Day 3: 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) 2022 चा ब्लॉकबस्टर कन्नड चित्रपट (Kannada Movies) 'कांतारा'चा प्रीक्वल, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि दसऱ्याच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच, या चित्रपटानं वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक ओपनिंग मिळवण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस, चित्रपटाच्या कमाईनं 100 कोटींची (अंदाजे 1 अब्ज) पातळी ओलांडली. यामध्ये हिंदी, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलुगूसह इतर भाषांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया तिसऱ्या दिवशी आतापर्यंत त्यानं किती कमाई केली, याबाबत सविस्तर...
'कांतारा चॅप्टर 1'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं पहिल्या दिवशी 61.85 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 46 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी सकाळी 10:15 वाजेपर्यंत, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं 53.82 कोटींची कमाई केली होती, ज्यामुळे एकूण कमाई 161.67 कोटी झाली.
'कांतारा चॅप्टर 1'नं तीनच दिवसांत मोडलेत धमाकेदार रेकॉर्ड्स
यावर्षी प्रदर्शित झालेल्या टॉप 10 कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांमध्ये 'महावतार नरसिंह' (250.29 कोटी) वगळता या चित्रपटाने सर्व विक्रमांना मागे टाकलंय. एवढंच नाही तर त्यानं टॉप 10 कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये 'जॉली एलएलबी 3' (104.1 कोटी), 'सिकंदर' (110.36 कोटी) आणि 'स्काय फोर्स' (113.62 कोटी) यांनाही मागे टाकलंय. आता चित्रपटाचं पुढचं लक्ष्य आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट आहे, ज्यानं लाईफटाईम कलेक्शनमध्ये 166.19 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
'कांतारा चॅप्टर 1'चा वर्ल्डवाईड कलेक्शन
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं दोन दिवसांत जगभरात तब्बल 148 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंतच्या देशांतर्गत कमाईत चित्रपटानं जवळपास 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठलाय.
दरम्यान, ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' हजारो वर्षांपूर्वीच्या जुन्या दंतकथांमधील देवतांवर आधारित आहे. चित्रपटाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे, बहुतेक समीक्षक आणि प्रेक्षकांनी चित्रपटाचा क्लायमॅक्स आणि सीन्सचं जोरदार कौतुक केलंय. ऋषभ चित्रपटात दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता दोघांचीही भूमिका साकारताना दिसतोय. चित्रपटात रुक्मिणी वसंत आणि गुलशन देवैया यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :