Kantara: साऊथ चित्रपटांना सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या कांतारा (Kantara) या साऊथ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीचं  (Rishabh Shetty) अनेकांनी कौतुक केलं.  कांतारामुळे ऋषभला विशेष लोकप्रियता मिळाली. कांतारा चित्रपटामध्ये अभिनेत्री सप्तमी गौडानं (Sapthami Gowda)  प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटामधील ऋषभ आणि सप्तमी यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सप्तमी ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. 


सप्तमी गौडा ही विवेक अग्निहोत्री यांच्या 'द वैक्सीन वॉर (The vaccine War)' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. सप्तमीनं एक ट्वीट नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाल्यानं मी आनंदी आणि उत्साहित झाले. मला संधी दिल्याबद्दल मी विवेक अग्निहोत्री यांचे आभार मानते.' 


सप्तमीच्या ट्वीटला विवेक अग्निहोत्री यांनी रिप्लाय दिला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ' सप्तमी तुझे स्वागत. द वॅक्सिन वॉरमधील तुझी भूमिका अनेकांच्या हृदयाला स्पर्श करेल.'






विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ‘द वॅक्सीन वॉर’ चं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची घोषणा केली होती. या पोस्टरला विवेक यांनी कॅप्शन दिलं, 'सादर करत आहोत- ‘द वॅक्सीन वॉर’. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.'




ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. माणूस आणि निसर्ग यांच्या नातेसंबंधावर अधारित असणाऱ्या या चित्रपटानं 2022 मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाच्या यादीत स्थान मिळवलं.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची जादू ऑस्करमध्येही, 'या' दोन श्रेणींमध्ये मिळवलं स्थान