Kantara in Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' (Kantara Movie) या चित्रपटाने अखेर ऑस्करच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. हा चित्रपट ऑस्कर 2023 साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणींमध्ये पात्र ठरला आहे. ऑस्कर 2023 या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार कार्यक्रमात कांताराला उशीरा प्रवेश मिळाला आणि चाहत्यांना आता या चित्रपटाच्या या यशाचा अभिमान वाटत आहे. ऋषभ शेट्टीने कांतारा या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे.


ऋषभ शेट्टीने ट्विट करून आनंद व्यक्त केला


चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी ऑस्करमध्ये एन्ट्री मिळाल्यानंतर फार आनंदी आहे. ऋषभ शेट्टीने ट्विट करून आपला आनंदही व्यक्त केला आहे. शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'कांतारा'ला 2 ऑस्कर नॉमिनेशन मिळाल्याची माहिती देताना अतिशय आनंद होत आहे. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या पाठिंब्याने हा प्रवास आणखी शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. 






ऑस्करच्या शर्यतीत RRR बरोबरच कांताराचाही डंका 


ऑस्कर्चाय शर्यतीत RRR चित्रपटाच्या बरोबरच कांताराची समावेश आहे. त्यामुळे साऊथ चित्रपटसृष्टीसाठी आणि कलाकारांसाठी 2023 नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. ज्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. काही आठवड्यांपूर्वी एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' मधील 'नाचो नाचो' हे गाणे सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या कॅटेगरीत आलं. यासोबतच एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' आणि ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या सिनेमांसाठी ऑस्करची शर्यत सुरू झाली आहे. या चित्रपटांनी अंतिम नामांकनातही स्थान मिळावे, अशी चाहत्यांची प्रार्थना आहे.


2022 चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा'


ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा 2022 चा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. याने केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर परदेशातही कमाईचे सर्व विक्रम मोडले. जागतिक स्तरावर या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई करून विक्रम केला होता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Oscars 2023:  द कश्मीर फाईल्स ते मी वसंतराव; 'हे' चित्रपट ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत; 25 जानेवारीला नामांकनाची यादी होणार जाहीर