नवी दिल्ली : कन्नड अभिनेत्री Shanaya Katwe हिच्यावर काही गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. 'Ondu Ghanteya Kathe' या चित्रपटातून झळकलेल्या या अभिनेत्रीला तिच्या भावाच्याच हत्येच्या आरोपांमुळं या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. 32 वर्षीय भाऊ राकेश कटवे याच्या हत्येचा आरोप असल्यामुळं शनायाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हुबळी ग्रामीण पोलिसांनी तिला ताब्यात घेत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. 


दुरवस्थेत आढळला मृतदेह 


सदर प्रकरणी पोलिसांनी शनायाचा प्रियकर नियाज अहमद यालाही ताब्यात घेतलं आहे. यासोबतच आणखी तीन-चार व्यक्तींनाही ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 21 वर्षीय तौसीफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवालेचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राकेशचा मृतदेह अतिशय दुरवस्थेत आढळला होता. त्याच्या धडावरील भाग देवरगुडीहलमधील वन क्षेत्रात मिळाला तर, शरीराच्या इतर भागांनाही वेगळं करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. 


हत्या नेमकी कशी झाली? 


विविध माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हुबळीमध्ये शनाया आणि राकेशच्या घरीच ही घटना घडली. राकेशची गळा दाबून हत्या करण्यात आली. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार राकेशच्या हत्येचे धागेदोरे त्याची बहिण शनाया हिच्यापर्यंत पोहोचले. कथित आरोपी नियाज अहमद आणि शनाया एकमेकांवर प्रेम करत होते ही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. 


Earthquake : आसाममध्ये शक्तिशाली भूकंपाचे हादरे; दूरवर जाणवली तीव्रता 


शनाया आणि नियाज यांच्या नात्याला राकेशचा विरोध होता. ज्यामुळंच शनायानं भावाच्याच हत्येचा कट रचत्याचं म्हटलं जात आहे. 9 एप्रिलला चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमानंतर शनाया 9 एप्रिलला हुबळी येथे आली. याचवेळी निय़ाज त्याच्या तीन मित्रांसह तेथे आला आणि तिथेच राकेशची हत्या करण्यात आली. पुढे राकेशच्या मृतदेहाची दुरवस्था करुन विविध ठिकाणी मृतदेहाचे अवशेष फेकण्याचं निंदनीय कृत्य त्यांनी केलं. सध्या या प्रकरणामुळं पुरतं कन्नड कलाविश्व हादरलं आहे.