Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, त्या भागातील खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिचं एक पॉडकास्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 2024 मध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून येत तिने आपला राजकीय प्रवास सुरू केला. या पॉडकास्टमध्ये कंगनाने कबूल केले आहे की, ती अजूनही राजकारणात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती सध्या आपल्या राजकीय कार्यकाळाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही आहे.

कंगनाने 'एआयआर आत्मन् इन रवी' (AIR Atman In Ravi) या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टमध्ये आपल्या राजकीय प्रवासाबद्दल खुलेपणाने भाष्य केले. तिला एक प्रस्ताव मिळाल्यानंतरच तिने राजकारणात प्रवेश केल्याचे तिने उघड केले. जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला या क्षेत्रात मजा येतो का, तेव्हा तिने उत्तर दिले – “मला हळूहळू याची समज येत आहे. मी असं म्हणणार नाही की मला यात मजा येतेय. हे फार वेगळं काम आहे. मी कधीच लोकांची सेवा करण्याबद्दल विचार केला नव्हता.”

कंगनाने पुढे सांगितले की, “मी महिलांच्या हक्कांसाठी लढली आहे, पण ती वेगळी गोष्ट आहे. आता लोक माझ्याकडे रस्ते आणि गटारांच्या समस्या घेऊन येतात. मी खासदार आहे, आणि हे लोक पंचायत स्तराच्या तक्रारी घेऊन येतात. आमदार  रस्त्यांच्या समस्या घेऊन येतात. मी त्यांना समजावते की हा राज्य सरकारचा विषय आहे, तेव्हा ते म्हणतात – तुमच्याकडे पैसे आहेत, तुमचे पैसे वापरा.”

सामाजिक कार्याची पार्श्वभूमी नाहीच

पॉडकास्टदरम्यान जेव्हा तिला विचारले गेले की ती एक दिवस पंतप्रधान बनण्याची इच्छा ठेवते का, तेव्हा कंगनाने उत्तर दिले की, तिला असं वाटत नाही की ती त्या भूमिकेसाठी योग्य आहे. कारण, सामाजिक कार्य हा तिचा भाग कधीच नव्हता. तिने कबूल केले की, “मी आयुष्यभर फारच स्वार्थी जीवन जगले आहे.”

2024 मध्ये विक्रमादित्य यांच्यावर विजय

कंगना रनौत हिने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. तिने काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा तब्बल 74,755 मतांच्या फरकाने पराभव केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रामायणममधील सीतेच्या भूमिकेसाठी किती मानधन घेतलं? साई पल्लवीची एकूण संपत्ती किती कोटी? आकडा ऐकून डोळे विस्फारतील