Varsha Gaikwad : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं मी अभिनंदन करते पण एक प्रश्न पण इथे येतो की, माधव भंडारी जे आमच्या विरोधात इतकं बोलत होते, त्यांना संधी दिली गेली नाही. पूनम महाजन त्यांच्या वडिलांपासून भाजपमध्ये सगळे सक्रिय आहेत, त्यांना संधी डावलण्यात आली आणि जे मागून आले त्यांना संधी दिल्याचे गायकवाड म्हणाले. उज्वल निकम यांना मी नाही जनतेने पाडले आहे. जनतेने त्यांचा पराभव केल्याचे गायकवाड म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उज्वल निकम यांचा पराभव झाला होता
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना नव्याने बक्षीस दिलं होतं. उज्ज्वल निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला होता.
लोकांना संविधानाने बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय
आजही संविधान बचाव जनसंवाद सभेच आयोजन केलं आहे. सध्या देशात असंविधान सुरु आहे. सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य आहे. अशा नागरिकांनाचा आवाज बनणार तरी कोण? त्यासाठी आम्ही ही सभा आयोजित केली आहे. लोकांना संविधानाने बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पत्रकारांना त्यांचं मतं मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सरकारकडून काढला जातं आहे. आम्ही अदानीबद्दल बोलतो त्यांच्यावर आम्ही बोलायचं नाही का मग? असा सवाल गायकवाड यांनी केला.
सगळे माओवादी कसे काय होऊ शकतात? असेही त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित (The President of India Rajya Sabha Nomination) व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a) अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या कायदेमंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञता आणण्याची संधी मिळते. या चार नावांमध्ये कायदा, परराष्ट्र धोरण, शिक्षण आणि इतिहास अशा विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या: