Vikram Starcast Fees : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) हा चित्रपट तीन जून रोजी रिलीज होणार आहे. विक्रम हा चित्रपट तमिळ भाषेबरोबरच हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे. कमल हसनचे या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहात आहेत. चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 200 कोटींची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग आणि ओटीटी राइट्मधून या चित्रपटानं एवढी कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटामधील कलाकारांच्या मानधनाबाबत...
विक्रम चित्रपटामधील स्टार कास्टची फी
विक्रम या चित्रपटामध्ये कमल हसन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच ते या चित्रपटाचे निर्माते देखील आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलं आहे.
तसेच अभिनेता विजय सेतुपतीनं या चित्रपटासाठी दहा कोटींचे मानधन घेतलं आहे. पाहूयात इतर कलाकारांचे मानधन...
लोकेश कनगराज- आठ कोटी रुपये
फहद फासिल- चार कोटी रुपये
अनिरुद्ध चार कोटी रुपये
विक्रम चित्रपटाचे एकूण बजेट हे 150 कोटी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. या चित्रपटाची अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. विक्रम या चित्रपटामधून कमल हसन हे कमबॅक करणार आहेत. याआधी त्यांनी 2018 मध्ये 'विश्वरुपम' या चित्रपटामध्ये कमल हसन यांनी काम केले. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी म्हटले आहे की, कमल हासनचा 'विक्रम' सिनेमा रिलीज होण्याआधीच आधीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचीदेखील झलक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
- Depp vs Amber Case: मानहानीच्या प्रकरणात जॉनी डेपचा विजय! एम्बर हर्डला द्यावी लागणार ‘इतकी’ नुकसान भरपाई
- Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...
- Amber Heard , Johnny Depp : जॉनी डेप-एम्बर हर्ड कोर्टात आमने-सामने, सुनावणी दरम्यान ‘या’ व्यक्तीला दाखवला गेला बाहेरचा रस्ता!