Kailas Waghmare and Vishakha Subhedar  : ‘जावई’ म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतात. जावयाला काय हवं? काय नको? त्याला काही  कमी पडायला नको यासाठी सासू-सासऱ्यांची कायम धडपड सुरू असते. अशीच एका  घरातील  सासू आणि जावई  यांच्यातील  धमाल जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. ‘पाणीपुरी’ या आगामी चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे (Kailas Waghmare) जावयाच्या भूमिकेत तर त्याच्या खाष्ट सासूच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) आपल्याला पहायला मिळणार आहेत.

Continues below advertisement

एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ 15 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

सिनेमाची कथा नेमकी काय?

‘पाणीपुरी’ चित्रपटात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी चिवट सासू रंगवली आहे. तिचा आणि जावयाचा कलगीतुरा सतत सुरु असतो. सासू आणि जावई यांच्या जुगलबंदीत काय होतं? याची धमाल गोष्ट ‘पाणीपुरी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. धमाल कथानक, उत्तम स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल असा विश्वास  या दोघांनी  व्यक्त केला. 

Continues below advertisement

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.  गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटे, अजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत. 

शिवाजी अंडरग्राऊंड ही भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या माध्यमातून कैलास वाघमारेने रंगभूमीवर एन्ट्री केली. त्यानंतर अनेक आशयघन सिनेमातून कैलसाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विशाखा सुभेदारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच सध्या विशाखा स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.                        

ही बातमी वाचा : 

Gunaratna Sadavarte : बिग बॉसमधील एन्ट्रीआधीच गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी, थेट पोलीस स्थानक गाठलं