Shani Shukra Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलतात आणि शुभ-अशुभ योग तयार करतात. या योगांचा पृथ्वीसह देशावर आणि जगावर थेट परिणाम होतो. यातच आता तब्बल 100 वर्षांनंतर शुक्र (Shukra) आणि शनीने (Shani) एकत्र येऊन नवपंचम राजयोग (Navpancham Rajyog) तयार केला आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. या काळात 3 राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकतं, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


तूळ रास (Libra)


शनि आणि शुक्राची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र देखील स्वतःच्या तूळ राशीत मालव्य राजयोग निर्माण करत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला मान, कीर्ती आणि वैभव प्राप्त होईल. या काळात तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकतं. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. दुसरीकडे, जर तुमचं काम किंवा व्यवसाय पेट्रोल, खनिजं, तेल, लोह इत्यादींशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच, ज्या लोकांचं करिअर हॉटेल लाईन, मॉडेलिंग, फिल्म लाइन आणि कला क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांना विशेष लाभ मिळू शकतात.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि शुक्राची युती अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. या कालावधीत तुम्हाला बेटिंग, लॉटरी आणि शेअर्समध्ये नफा मिळू शकतो. तसेच या काळात तुमचं काम यशस्वी होऊ शकतं. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.


कुंभ रास (Aquarius)


शनि आणि शुक्राची युती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शनिदेव फक्त तुमच्या राशीत स्थित आहेत. तसेच शुक्र ग्रह तुमच्या भाग्याच्या घरात आहे. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या