Leena Manimekalai : सध्या काली (Kaali) या डॉक्युमेंट्रीमुळे चित्रपट दिग्दर्शक लीना मणिकेलाई (Leena Manimekalai) या चर्चेत आहेत. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काहींनी लीना मणिकेलाई यांचे समर्थन केले तर काहींनी या डॉक्युमेंट्रीचा विरोध केला. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर अशोक पंडित (Ashok pandit) यांनी लीना यांच्या या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 


अशोक पंडित यांनी शेअर ट्वीट शेअर केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'इस्लामचा आपमान हा अपमान मानला जातो. तसेच ख्रिश्चन आणि सिख लोकांचा अपमान देखील आपमान मानला जातो. मग हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे करणारी व्यक्ती हिंदू असेल तर आणखी सोपे आहे.' अशोक पंडित यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


अशोक पंडित यांचे ट्वीट:






दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या या डॉक्युमेंट्रीचे नाव ‘काली’ आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील युझर्स संतापले आहेत.  


गुरुवार सकाळी लीना यांनी एक ट्वीट शेअर केलं.  लीना यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शंकर आणि पार्वती यांची भूमिका साकारणारे कलाकार हे सिगारेट ओढताना दिसत आहे. 'दुसरीकडे कुठेतरी', असं कॅप्शन लीना यांनी या ट्वीटला दिलं आहे. या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. 


हेही वाचा: