K.G.F: Chapter 2 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार यशच्या (Yash) बहुचर्चित 'केजीएफ 2' (K.G.F: Chapter 2) या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेनं पाहात आहेत. यश सध्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीमध्ये यशला आरआरआर (RRR) आणि द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या दोन चित्रपटांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला यशनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
मुलाखतीमध्ये यशला प्रश्न विचारण्यात आला की, 'तु आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स हे चित्रपट पाहिले आहेत का?' तर या प्रश्नाला यशनं उत्तर दिलं, 'नाही, मी हे चित्रपट पाहिले नाही. मला हे चित्रपट पाहायचे आहेत, पण वेळ मिळत नाही. सध्या तरी मी फक्त केजीएफ पाहात आहे. '
केजीएफ-2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यशसोबतच संजय दत्त, मालविका अविनाश आणि रवीना टंडन हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. केजीएफ चॅप्टर-2 साठी यशनं 25 कोटी मानधन घेतलं आहे. चित्रपटामध्ये संजय दत्तनं अधीरा ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. अधीरा ही भूमिका साकारण्यासाठी संजय दत्तनं नऊ कोटी रूपये फी घेतली आहे. अभिनेत्री रवीना टंडन या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तिनं या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 1.5 कोटी फी घेतली आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक प्रशांत नील यांनी लिहिले आहे तर विजय किरागंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha