Kajol House Rent : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) चाहता वर्ग मोठा आहे. काजोलकडे अनेक लग्धरी गाड्या आणि आलिशन घरं आहेत. काजोल आणि अजय देवगण (Ajay Devgan) सध्या  जुहूमध्ये (Juhu)  राहतात. मुंबईमधील पवई येथे देखील काजोलचं घर आहे. हे घर नुकतेच  तिने भाड्याने दिल आहे. जाणून घेऊयात काजोल या घराचं भाडं किती घेते? 

Continues below advertisement


रिपोर्टनुसार, काजोलचे घर पवईमधील  हीरानंदानी गार्डन येथे आहे. काजोलचे हे घर 771 स्क्वेअर फीट आहे. हीरानंदानी गार्डन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावर काजोलचं हे घर आहे. हे घर तिने भाड्याने दिलं आहे.  रिपोर्टनुसार घरात राहणाऱ्या भाडेकरूने 3 लाख रूपये सिक्यूरिटीसाठी जमा केले आहे. आधी या घराचे भाडे हे 90 हजर होते. पण काही दिवसापूर्वी घराचे भाडे वाढवले असून आता या घराचे भाडे 96,750 रूपये आहे. 


अजय आणि काजोलच्या जुहूच्या घराचे नाव शिवशक्ती आहे. त्यांच्या घराजवळच अमिताभ बच्चन, अक्षय कुमार और ह्रतिक रोशन यांची देखील घरं आहेत. रिपोर्टनुसार अजयने त्याचे जुहू येथील घर  60 कोटी रूपयांना घेतले. 
 


अजय आणि काजोलची लव्ह-स्टोरी
अजय आणि काजेलच्या रोमँटिक केमिस्ट्रीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळते.  1999 मध्ये काजोल आणि अजयने लग्नगाठ बांधली. त्यांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी आहे. 'हलचल' चित्रपटाच्या शुटींगवेळी हे दोघेही जवळ आले. त्यानंतर चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांचेही लग्न झाले.


काजोलची पहिली कार 
प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने सोशल मीडियावर तिच्या पहिल्या गाडीचा म्हणजेच  Maruti Suzuki 1000चा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने कॅप्शन दिले, 'हे माझं पहिलं प्रेम'


महत्त्वाच्या बातम्या :


Sonu Sood Car Collection: 2 कोटीच्या लग्झरी कारपासून ते 25 हजाराच्या स्कूटरपर्यंत; सोनू सूदच्या गाड्यांचे खास कलेक्शन


Ajay Devgn : अजय देवगण नाही... तर 'हे' आहे बॉलिवूडच्या सिंघमचं खरं नाव; पण का बदललं नाव?