Joselyn Cano Death 'Mexican Kim Kardashian' अशी ओळख असणाऱ्या आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर कमालीची लोकप्रिय असणाऱ्या जोसेलिन कॅनो हिला अतिशय कमी वयातच जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर अतिशय झपाट्यानं व्हायरल होत आहे.
जोसेलिन कॅनो हिचा मृत्यू Butt-Lift सर्जरीदरम्यान झालेल्या काही चुकांमुळं झाल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जोसलिन 7 डिसेंबरला संपूर्ण प्रक्रियेसाठी कोलंबियाला गेली होती. तिथंच तिनं अखेरचा श्वास घेतल्याचं म्हटलं जात आहे.
न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया येथील एका रहिवाशानं दिलेल्या माहितीनुसार तिच्या अंत्य,रांचं थेट प्रक्षेपण युट्यूबवर करण्यात आलं होतं. कोरोना नियमावलीमुळं फार कमीजणांच्या उपस्थितीतच तिला अखेरचा निरोप देण्यात आला. सर्वत्र जोसेलिनच्या निधनाचं वृत्त असलं तरीही याबाबत तिच्या कुटुंबाच्या प्रतिक्रियेचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
तिच्या निधनाची माहिती, Lira Mercer या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं शेअर केली होती. 12.8 मिलीयन फॉलोअर्स असणाऱ्या या इन्स्टाग्राम स्टारनं वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्यामुळं तिच्या फॉलोअर्सना धक्काच बसला.
शरीरावर अनेक शस्त्रक्रिया करत बांधा म्हणा किंवा मग एखादा अवयव. ते अधिक आकर्षक करण्याकडे सेलिब्रिटींचा असणारा कल ही काही नवी बाब नाही. अशा शस्त्रक्रिया केलेल्या सेलिब्रिटींची उदाहरणंही आपल्यासमोर आहेत. पण, एखाद्या शस्त्रक्रियेमध्ये काही अडथळे आल्यास हे चुकीचं पाऊल जीवावरही बेतू शकतं हीच बाब या इन्स्टाग्राम स्टारच्या निधनानं अधोरेखित होत आहे.