Johnny Depp Vs Amber Heard : अमेरिकन अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) आणि अभिनेता जॉनी क्रिस्टोफर डेप (Johnny Christopher Depp) यांचे आयुष्य एका नवीन वळणावर आले आहे, जिथून या दोघांनाही आता मागे वळून पाहायचे नाही. दोघांनी एकमेकांवर मानहानीचा दावा करत, अनेक आरोप केले आहेत. व्हर्जिनिया ज्युरी या प्रकरणाची सुनावणी करत आहे. दोघांची ही सुनावणी मेच्या अखेरीपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे.
अमेरिकन अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड आणि अभिनेता जॉनी क्रिस्टोफर डेप हे सुंदर जोडपे परस्पर वादांमुळे बरेच दिवस चर्चेत होते. एम्बर हर्डने माजी पती जॉन डेप विरुद्ध $100 दशलक्ष मानहानीचा दावा दाखल केला आहे. हर्ड आणि डेप यांच्यातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी सध्या सुरु आहे. जाणून घेऊया आतापर्यंत या सुन्वणीत काय काय घडलं...
- डेपने साक्ष दिली की, त्याने कधीही हर्ड किंवा इतर कोणत्याही महिलेला मारहाण केलेली नाही. तो म्हणाला की, एम्बरच नेहमी वाईट वागत होती आणि आपल्याला अपमानास्पद वागणूक देत होती.
‘हा केवळ माझ्याप्रती तिचा द्वेष होता असे वाटते’, असे डेप म्हणाला. ‘जर मी वाद घालत राहिलो, तर मला खात्री होती की, तो हिंसाचारात बदलणार आहे आणि अनेकदा असे झाले.’
- डेपने सांगितले की, 2015च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या वादाच्या वेळी हर्डने वोडकाची बाटली त्याला फेकून मारली. ज्यामुळे त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग तुटला. अभिनेत्याने म्हटले की, याच त्याला जबर धक्का बसला होता आणि याच बोटातील रक्त वापरून त्याने भिंतीवर हर्डसाठी एक मेसेज लिहिला.
यावर आपली बाजू माडंत, रडत हर्डने ज्युरीला सांगितले की, डेपने तिच्यावर अमानवीय अत्याचार केला होता. ती म्हणाली, मला भीती वाटत होती. माझे नुकतेच त्याच्याशी लग्न झाले होते.
- हर्ड म्हणाली, काही महिन्यांनंतर, डेपने दुसऱ्या एका हिंसक वादात तिचे नाक तोडले आणि केसांचे तुकडे तुकडे केले.
- हर्डच्या वकिलांनी कोर्टात काही फोटो सादर केले, ज्यात त्यांच्यात झालेल्या वाद आणि हाणामारीनंतरच्या जखमा दिसत होत्या. तिने रेड कार्पेटवर पोज देतेवेळी तिच्या हातावर दिसणारे चट्टे आणि डोळ्याभोवती लालसरपणा आणि सूज यांचा समावेशही या फोटोंमध्ये आहे, डेपने फेकून मारलेल्या फोनमुळे ही दुखापत झाली होती. मात्र, डेपच्या वकिलांनी देखील काही फोटो दाखवले, जे त्यांच्यातील वादाच्या दरम्यान घेण्यात आले होत्या आणि यात तिला कोणतीही दुखापत झालेली दिसत नव्हती.
- डेपने 2016मध्ये त्यांच्या पलंगावर विष्ठा आढळल्याची साक्ष दिली. त्याच्या एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की हर्डने त्याला म्हटले होते, हा एक विनोद होता, जो चुकीच्या पद्धतीने घडला आहे. हर्डने यात आपला कोणताही सहभाग नसल्याचे म्हणत. घरातील कुत्र्यांपैकी कुणी हे केले असावे, असे म्हटले आहे.
- हर्ड म्हणाली की, त्याच्या ‘विनो फॉरएव्हर’ असे लिहिलेल्या टॅटूवर जेव्हा ती हसली, तेव्हा डेपने तिला जोरदार थप्पड लगावली. ही त्याने पहिल्यांदाच दिलेली शारीरिक अपमानास्पद वागणूक दिली. डेपची माजी मैत्रीण, विनोना रायडरचा संदर्भ देत या टॅटूमध्ये पूर्वी ‘विनोना फॉरएव्हर’ असे म्हटले होते.
- ज्युरर्सनी डेपची एक ऑडिओ क्लिप ऐकली, ज्यात त्यांच्या शेवटच्या वादादरम्यान त्याने स्वतःला चाकूने मारण्याची धमकी दिली होती.
त्यावेळी मी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या त्याच परिस्थितीत होतो. मी कोलमडून गेलो होतो. मला वाटत होते की या सगळ्यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे माझे रक्त.. तितकेच माझ्याकडे उरले होते, तेही कुणी घेऊन टाकावे, असे डेप म्हणाला.
- हर्डच्या वकिलांनी कोर्टात काही मेसेज सादर केले ज्यामध्ये डेपने हर्डसाठी काही अपमानास्पद शब्द वापरले होते आणि म्हटले होते की, तिचा मृत्यू व्हावा असे वाटत आहे.
2013 मध्ये अभिनेता पॉल बेटानी यांला मेसेज लिहित डेपने म्हटले होते की, ‘तिला जाळण्यापूर्वी आपण तिला बुडवू या आणि ती मेली आहे याची खात्री करण्यासाठी, मी नंतर तिच्या जळलेल्या मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवेन.’
हेही वाचा :
Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...