Who Is Imtiaz Ali First Choice For Rockstar: स्टार कीड असलेल्या रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) 'सावरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या 'रॉकस्टार' सिनेमामुळे. रणबीरच्या सिनेमांचा साधा विषयही निघाला तरी पहिलं नाव, 'रॉकस्टार' (Rockstar Movie) सिनेमाचंचं येतं. पण, तुम्हाला माहितीय का? 'रॉकस्टार' सिनेमासाठी दिग्दर्शक इम्तियाज अली यांची पहिली पसंत रणबीर कपूर कधीच नव्हता. दिग्दर्शकांना भलत्याच बॉलिवूड स्टारला घेऊन हा सिनेमा करायचा होता. पण, काही कारणास्तव हा सिनेमा रणबीर कपूरच्या पदरात पडला आणि सुपरहिट सिनेमा करुन रणबीर सुपरस्टार्सच्या यादीत समाविष्ट झाला.
NDTV च्या 'क्रिएटर्स मंच'साठी दिग्दर्शक इम्तियाज अली उपस्थित होते. त्यावेळी बोलताना इम्तियाज अली यांनी रॉकस्टार सिनेमाबाबत मोठा खुलासा केला. तसेच, इतरही अनेक गोष्टींवर भाष्य केलं. दरम्यान, महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या या कार्यक्रमात दिग्दर्शक इम्तियाज अलींसोबतच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर, कवी कुमार विश्वास आणि लेखक चेतन भगतही उपस्थित होते.
दिग्दर्शकांना कोणत्या सुपरस्टारसोबत रॉकस्टार करायचा होता?
दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आपली हिट फिल्म 'रॉकस्टार'बाबत बोलताना म्हटलं की, रॉकस्टारसाठी रणबीर कपूरचा विचार कधी केलाच नव्हता. दिग्दर्शकांनी या रोमॅन्टिक म्युझिकल फिल्मसाठी सर्वात आधी जॉन इब्राहिमला हेरलं होतं. ही गोष्ट इम्तियाज अलींची फिल्म जब वी मेटच्या वेळची आहे. पण, त्यानंतर त्यांनी जॉन इब्राहिमच्या ऐवजी रणबीर कपूरला घेतलं.
दरम्यान, फिल्म 'रॉकस्टार' 2011 मध्ये थिएटर्समध्ये रिलीज झालेली. या फिल्ममध्ये रणबीर कपूरसोबत नरगिस फाकरी मुख्य भूमिकेत होती. या फिल्मच्या स्टोरीसोबतच गाण्यांनीही प्रेक्षकांना भूरळ घातलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :