Khushi Mukherjee News: अभिनेत्री खुशी मुखर्जी (Actress Khushi Mukherjee) आपल्या रिविलिंग आऊटफिट्समुळे चर्चेत असते. तिचा लूक आणि स्टाईलमुळे ती बऱ्याचदा ट्रोल होत असते. आता असाच खुशी मुखर्जी तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच ती फक्त कुर्ता घालून स्पॉट झाली होती. खुशी कपूरनं खाली काही घातलंच नव्हतं. तिनं तिच्या त्या विचित्र आणि रिलिविंग लूकमध्ये पॅपाराझींसमोर पोझही दिल्या. पण, फक्त नेटकऱ्यांनीच नाहीतर पॅपाराझींनीही तिला ट्रोल केलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी तिला खरं-खोटं सुनावलंसुद्धा. खुशीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. 

एका मुलाखतीत बोलताना खुशी म्हणाली होती की, पॅपाराझी फोटो काढतात आणि माझं नाव खराब होतं. यानंतर फोटो क्लिक करणाऱ्या पॅपाराझींना राग आला. पॅपाराझींशी बोलताना खुशी मुखर्जी म्हणालेली की, "जेव्हा माझ्या ड्रेसचा कपडा उडत होता, नेमकं तेव्हाच तुम्ही मला पोज द्यायला सांगितली. मी तुमच्याशी मस्करी करते आणि तुम्ही माझ्यावर चिडताय..."

"असे कपडे घालूच नकोस..." 

खुशीशी बोलताना पॅपाराजी म्हणाले की, "असं होतं की, तुमच्यामुळे इतर सेलिब्रिटी आम्हाला टार्गेट करतात की, मीडिया असं करते आणि आम्ही असं काही करत नाही." यावर खुशी हसली आणि म्हणाली की, "गेहूं के साथ-साथ घुन भी पिस जाता है..." मग एक पॅपाराझी म्हणतो की, तुम्ही असे कपडे घालू नका. लोक कमेंटमध्येही वाईट बोलतात. थट्टा-मस्करीत टार्गेट आम्ही होतोय.  

खुशी म्हणते की, "अच्छा. ठीक आहे... तसं तर तुमच्यासोबत माझं असंच चालतं... तुम्ही ते क्रॉप करू शकता..." तर, पुन्हा पॅपाराझी खुशीला म्हणतात, "आम्ही नाही करत, आम्ही कंपनीला पाठवतो, त्यानंतर जे होतं ते होतं... " मग, संतापलेल्या पॅपाराझींना खुशी मुखर्जी सॉरी म्हणते. 

दरम्यान, याआधी एका मुलाखतीत खुशी मुखर्जी म्हणाली होती, मग मी फक्त लोक आजूबाजूला आहेत, म्हणून बुरखा घालायला सुरुवात करावी का? जेणेकरून लोक माझ्याकडे अशा नजरेनं पाहू नयेत. जर ती सुंदर गोष्ट असेल तर लोक नक्कीच त्याकडे पाहतील. जेव्हा लोक माझ्याकडे पाहतात तेव्हा मला ते आवडतं."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट