Jitendra Kumar : पंचायतमधून सजिवजी, कोटा फॅक्ट्रीमधून जितू भैय्या अशा भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणजे जितेंद्र कुमार (Jitendra Kumar). ओटीटी माध्यमांवर त्याने त्याच्या अभिनयाची छाप उत्तमरित्या पाडली आहे. पंचायत या सिरिजमुळे जितेंद्रला विशेष पसंती मिळाली. सध्या त्याच्या पंचायत 3 (Panchayat 3) या वेब सिरिजची प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली आहे. छोट्या शहरातून आलेला हा अभिनेता त्याच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत त्याचं स्थान निर्माण करु शकला. पंचायत या सिरिजमध्ये रिकींसोबतचं त्याचं नातं हे विशेष भावलं. पण त्याच्या आयुष्यातल्या खऱ्या रिंकीविषयी अभिनेत्याने नुकताच खुलासा केला आहे.
जितेंद्रने एका मुलाखतीदरम्यान त्याची प्रेमकहाणी सांगितली आहे. तसेच यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातल्या क्रशविषयी देखील सांगितलं आहे. छोट्या शहरातून आलेल्या मुलांना फार विचित्र प्रेम होतं, असं यावेळी जितेंद्रनं म्हटलं. पंचायत या सिरिजमध्येही सचिवजीला रिंकीवर क्रश असतं. तसंच काहीसं जितेंद्रच्या खऱ्या आयुष्यतही घडलंय.
अशी होती खऱ्या आयुष्यातली रिंकी
त्याची लव्हस्टोरी सांगताना जितेंद्रनं म्हटलं की, एका फार विचित्र कारणामुळे मला एक मुलगी आवडली होती. एक दिवस ती वर्गात उशीरा आली तेव्हा शिक्षक तिच्यावर खूप ओरडले. त्यामुळे संपूर्ण वर्गात तिची इमेज खूप डाऊन झाली. तेव्हा मी वर्गात टॉपर असायचो. त्यावेळी मला असं वाटलं की जर मी तिच्या जागी असतो तर कदाचित शिक्षक मला इतकं नसते रागावले.
'अशाच कारणांमुळे तुम्हाला प्रेम होतं'
पुढे त्यानं म्हटलं की, तिच मुलगी पुढच्या दोन दिवसांत माझी क्रश झाली आणि मी तिच्या प्रेमातच पडलो. मला बराच काळ तिच्यावर क्रश होतं. ती माझं आयुष्यभराचं प्रेम आहे, असं म्हणूनच मी तिच्याकडे पाहू लागलो होतो. तुम्ही जर एखाद्या छोट्या शहरात गेलात तर तिथे तुम्हाला प्रेम करायला किंवा कोणतरी आवडायला फार विचित्र कारणं सापडतील आणि तिथे तुम्हाला अशाच कारणांमुळे प्रेम होतं.