Mystery Man in Jia Shankar Life: वेड फेम जिया शंकर सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ती आपले दैनंदिन अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून जिया शंकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिचं सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत नाव जोडलं गेलं होतं. नंतर अहानच्या टिमनं अफवा असल्याचं सांगितलं. यानंतरही पुन्हा एकदा जिया शंकर तिच्या लिंकअप्समुळे चर्चेत आली आहे. सध्या जिया शंकरचं नाव अभिषेक मल्हानसोबत जोडलं जात आहे. दोघांमध्ये रिलेशनशिप असल्याची चर्चा आहे. तिला वारंवार या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तिनं आतापर्यंत मौन बाळगलं होतं. मात्र, आता तिने या रिलेशनशिपबाबत खरी माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जिया शंकर आणि प्रसिद्ध यूट्यूबर अभिषेक मल्हान दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती होती. या कपलचं लवकरच साखरपूडा होणार अशी चर्चा सोशल मीडियात रंगली होती. मात्र, या चर्चांवर जिया शंकरने पूर्णविराम दिला आहे. तिनं अलिकडेच मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला. तसेच सर्वांनाच सुखद धक्का दिला. सध्या जियाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जिया शंकरच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅन नेमका कोण? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जिया आणि अभिषेक यांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते. दोघांमध्ये रिलेशनशिप सुरू आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की, जिया आणि अभिषेक यांचं अधिकृत असून ते लवकरच साखरपूडा करणार आहेत, असा दावा करण्यात आला होता. परंतु, या चर्चांना जियाने पूर्णविराम दिला आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तो व्यक्ती जियाच्या कपाळावर किस करताना दिसत आहे.
जिया शर्माची सोशल पोस्ट व्हायरल
या व्यक्तीचा फोटो तिनं इमोजीचा वापर करून लपवला आहे. या फोटोतून असे स्पष्ट होते की, ती यूट्यूबर अभिषेक मल्हानला नसून दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे. तिनं या फोटोला कॅप्शन दिलं आहे. 'खोट्या अफवांना 2025मध्येच सोडून देऊया' असं तिनं म्हटलं आहे. दरम्यान, मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण? जिया शंकर नेमकं कुणाला डेट करतेय? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.