पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या चर्चेत असलेल्या दोन टोळ्या यंदा निवडणुकीच्या रिंगणातही एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकणार आहेत. आंदेकर टोळीने हत्या केलेल्या आयुष कोमकरच्या आईने, कल्याणी कोमकरने (Kalyani Komkar) थेट सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar) यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये कल्याणी कोमकर यांनी अर्ज दाखल केला आहे. 

अजित पवारांनी जर आंदेकर कुटुंबीयांना उमेदवारी दिली तर आत्मदहन करेन असा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर कल्याणी कोमकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आंदेकर विरुद्ध कोमकर हा गुन्हेगारीतला संघर्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणार पाहायला मिळणार आहे. 

आयुष कोमकरच्या आईने शिंदेच्या शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी न मिळाल्याने मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी थेट कल्याणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Kalyani Komkar News : कल्याणी कोमकरांचा आरोप

कल्याणी कोमकर यांनी आंदेकरांच्या उमेदवारीवरुन अजित पवारांना इशारा दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की, "आंदेकरांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार आहे. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मला उमेदवारी द्यावी. अजित पवार यांना मी मागणी करते आहे की, आंदेकर यांना तिकीट देऊ नये. अजित पवार कोयता गँग थांबवा असे म्हणतात मग त्यांना तिकीट देऊ नये."

कल्याणी कोमकर पुढे म्हणाल्या होत्या की, "मी कोर्टात आंदेकर यांच्या विरोधात जाणार आहे. मला माहिती नाही, आंदेकर यांना कोण मदत करत आहे, पण राजकीय लोक मदत करतात, हे मात्र नक्की आहे. जर का त्यांना कोणीही तिकीट दिले, तर त्या पक्ष कार्यालयाबाहेर मी आंदोलन करेन." 

वनराज आंदेकर माझा भाऊ आहे, मी माझ्या भावाची सुपारी का देऊ, आम्ही असे काही केले नाही, तरी आम्ही भोगतोय असं कोमल आंदेकर म्हणाल्या. वनराज आंदेकरच्या हत्येत आमचा संबंध नाही, माझ्या मुलाचा, माझा कोणाशी वाद नव्हता. कोण असे का करेल? आंदेकरांना अपक्ष लढू द्या, पण पक्षाकडून नको. लोकाची घरे ते उध्वस्त करत आहेत असा आरोप कल्याणी कोमकरांनी केला.

ही बातमी वाचा: