New Year 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला आनंद, उत्साह तर वाटतोच. पण, त्याचबरोबर सतत जाणवत असते ती आपल्या करिअरची, भविष्याची आणि आरोग्याची चिंता. ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही वर्षाची धन आणि संपत्तीची स्थिती पाहण्यासाठी मुख्यत: दो मुख्य ग्रहांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. एक म्हणजे बृहस्पती आणि दुसरा ग्रह शुक्र.
बृहस्पती ग्रहाला धन, ज्ञान आणि आर्थिक स्थितीचा कारक ग्रह मानतात. तर, शुक्र ग्रह ऐश्वर्य, वैभव आणि भौतिक सुख-संपत्तीचा कारक ग्रह मानतात. नवीन वर्षात बृहस्पतीच्या स्थितीत चढ-उतार पाहायला मिळेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती अस्थिर होऊ शकते. तर, शुक्र ग्रहाची स्थिती तुलनात्मकदृष्ट्या अधिक संकटाची स्थिती निर्माण होणार नाही.
2026 चा स्वामी सूर्य ग्रह आहे. हा ग्रह बदल आणि नवीन सुरुवातीचा संकेत देतो. तर, शनिचं मीन राशीत संक्रमण देखील परिवर्तन करणार आहेत. एप्रिलपासून ऑक्टोबर 2026 या दरम्यान तुम्ही करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मेष रास (Aries Horoscope)
नवीन वर्षात तुम्हाला धन-संपत्तीशी संबंधित काही चढ-उतार जाणवू शकतात. या काळात तुम्हाला आर्थिक दबाव जाणवेल. तसेच, या काळात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. जसे की, जुनी प्रॉपर्टी विकून नवीन खरेदी करणे, घराचं रिनोव्हेशन करणे इ.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन वर्ष हे समाधानाचं वर्ष आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. संपत्ती, वाहन आणि धनाची स्थिती चांगली असेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
2026 या वर्षात तुमच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या परिवर्तनात बदल होईल. तसेच, खर्चावर नियंत्रण ठेवाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
मागच्या वर्षात संघर्षमय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगला बदल घडलेला दिसेल. करिअरच्या बाबतीत तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष मेहनतीचं आणि संयमाची परीक्षा घेणारं आहे. या कालावधीत आरोग्य आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुमच्या खर्चात वाढ झालेली दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन वर्ष सामान्य असणार आहे. या काळात धन आणि करिअरशी संबंधित तुम्हाला चढ-उतार पाहायला मिळतील. या काळता तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची देखील सुरुवात करु शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी हा काळ फार सकारात्मक असेल. या काळात तुम्ही नवीन काम, प्रॉपर्टी किंवा करिअरमध्ये प्रगतीचे अनेक योग आहेत. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या काळात तुमची हळुहळू प्रगती पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, व्यवसाय करताना सावधानता बाळगा.
धनु रास (Saggitarius Horoscope)
2026 हे वर्ष परिवर्तनाचा संकेत देणारं आहे. या काळात आरोग्याच्या बाबतीत तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, घरातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात धन, संपत्ती आणि वाहन खरेदीचा योग आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घ्याल. पण कर्ज तसेच शेअर मार्केटपासून दूर राहा.
मीन रास (Pisces Horoscope)
धन संपत्तीच्या बाबतीत काहीसे चढ-उतार जाणवतील. या काळात करिअरमध्ये कोणतीच जोखीम हाती घेऊ नका. परदेशात प्रवासाचे योग आहेत.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)