मुंबई : काही दिवसांपूर्वी 'झिम्मा -2' (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. दरम्यान या चित्रपटाचा लास्ट शो चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. या निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) याने एक पोस्ट केलीये. या त्याच्या पोस्टला सोशल मीडियावर सध्या बरीच पसंती मिळतेयं. तसेच त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स देखील केल्या असल्याचं पाहायला मिळालं. 


सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवनी सुर्वे, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कलामंडळी असलेला झिम्मा -2 हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दरम्यान 9  आठवडे या चित्रपटाला चित्रपटगृहात प्रेक्षकांची पसंती मिळाली. या पोस्टमध्ये चित्रपटगृहातून प्रेक्षकांचा निरोप घेताना मन आनंदानं भरुन येतंय असं म्हणत चित्रपटगृहातून प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. 


हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत


सोशल मीडियावर हेमंतने ही पोस्ट शेअर केलीये. यामध्ये त्याने म्हटलंय की, 'चित्रपटगृहात दोन महिने म्हणजेच 9 आठवडे म्हणजेच 56 दिवस पूर्ण झालेत. आज चित्रपटगृहातून तुमची रजा घेताना मन आनंदानं भरुन येतंय. पण समानधानाने आणि प्रचंड अभिमानाने भरलेला हा प्रवास आमच्या कायम लक्षात राहिल. तुमचं अमाप प्रेम, तुमची आपुलकी, तुमचा हक्क आणि तुमचा विश्वास हीच झिम्मा 2 ची सर्वात सर्वात मोठी कमाई, हेच सर्वात मोठे बक्षीस. हा झिम्मा देखील आपला केलात त्याबद्दल धन्यवाद!'






OTT वर चित्रपटाची प्रतीक्षा


दरम्यान हेमंतच्या या पोस्ट अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत चित्रपट OTT वर कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतीक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर लागून राहिलीये. 


'झिम्मा 2'ची टूर सुसाट


बॉलिवूडचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'झिम्मा 2' (Jhimma 2) या चित्रपटांना टक्कर देताना पाहायला मिळालं. दरम्यान चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीनंतर तिसऱ्या आठवड्यात याचे शो देखील वाढवण्यात आलेत. कोटींची कमाई करणाऱ्या 'झिम्मा 2' या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केल्याचं पाहायला मिळालं. 


हेही वाचा : 


Bhakshak Teaser Out: सत्य समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकाराची कहाणी; 'भक्षक' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज