Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Maza) या अंगावर शहारे आणणाऱ्या गीताची आता पुननिर्मिती करण्यात आली आहे. या गीताचं लॉन्चिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते पार पडलं. 


'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा येत्या 28 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून त्याआधी शरद पवार यांच्या हस्ते 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. या गाण्याच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे, संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांच्यासह अभिनेता अंकुश चौधरीदेखील उपस्थित होता. 


'महाराष्ट्र गीत' नव्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं : केदार शिंदे


'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याच्या पुननिर्मितीच्या कार्यक्रमादम्यान केदार शिंदे (Kedar Shinde) म्हणाले,"जय जय महाराष्ट्र माझा'  या गाण्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्व पिढीतील कलावंतांनी काम केलं आहे, याचा मला आनंद आहे. नव्या पिढीतील कलावंतांना शाहीर सांबळेंबद्दल (Shahir Sable) काहीतरी वाटत आहे ही माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. या गाण्याचं शूटिंग करणं खूप कठीण होतं. पण 'महाराष्ट्र गीत' नव्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हीच शाहीर साबळेंना खरी मानवंदना ठरेल". 


केदार शिंदे पुढे म्हणाले,"महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची निर्मिती करताना माहितीपटापेक्षा व्यावसायिक सिनेमा बनवण्यावर भर होता. मनोरंजन करता करता शाहीर साबळेंच्या जीवनाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शाहीर साबळेंच्या वयाच्या 60 व्या वर्षापर्यंतचा प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे". 


'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताची पुननिर्मिती करताना गाणं गाण्यास तयार नव्हता अजय गोगावले 


'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक अजय गोगावले (Ajay Gogavale) 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याबद्दल म्हणाला,"महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंगीताचं बाळकडू मिळालं आहे. 'महाराष्ट्र माझा' हे मंचावर गायलेलं माझं पहिलं गाणं आहे. आता या सिनेमासाठी हे गाणं मी गायलेलं नाही. या गाण्याला मी योग्य न्याय देऊ शकत नाही असं मला वाटत होतं. त्यामुळे मी हे गाणं गाण्यास तयार नव्हतो. पण ज्या गाण्याने उभं केलं तेच गाणं आता पुन्हा गाताना एक वेगळाच आनंद आहे". 



संबंधित बातम्या


Kedar Shinde : "तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलं"; 'गर्जा महाराष्ट्र'ला राज्यगीताचा दर्जा दिल्यानंतर केदार शिंदेंची आजोबांसाठी खास पोस्ट