Virat Kohli in IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये विराट कोहली (Virat Kohli) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघही यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत आहे. तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी. मात्र संघातील खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहलीने मागील दोन सामन्यांमध्ये आरसीबीचं नेतृत्वही केलं आहे. मात्र यादरम्यान विराट कोहली आणि आरसीबी संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र यादरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली आहे. यामुळे त्याच्यावर बंदीचा धोका निर्माण झाला आहे.


आयपीएलमध्ये विराट कोहलीवर लागणार बॅन? 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर टाकल्या. स्लो ओव्हर रेटमुळे संघाला आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला. यामुळे स्टँड-इन कर्णधार विराट कोहली आणि संपूर्ण संघाला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार लाखोंचा फटका बसला. आयपीएलने नेमून दिलेल्या वेळेत आरसीबी संघ 20 षटकं टाकण्यात अयशस्वी ठरल्यामुळे त्याला 24 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला होता. फक्त कोहलीच नाही तर संपूर्ण बंगळुरूची प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेअर फाफ डू प्लेसिसला त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला. आणखी एका सामन्यात संघाने हीच चूक केली, तर हे संघाला महागात पडणार आहे.


दोन वेळा आरसीबी संघाकडून घडली 'ही' चूक


यापूर्वी फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने ही चूक केली आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे कणर्धार फाफ डु प्लेसिसला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. लखनौ संघ विजयाकडे कूच करत असताना आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिस सतत फील्ड, गोलंदाज आणि डावपेच बदलत होता. या दरम्यान त्यांचा बराच वेळ वाया गेला. यामुळे परिणामी आरसीबीला आयपीएलने नेमून दिलेल्या वेळेत षटकं टाकता आली नाहीत आणि त्यांनी स्लो ओव्हर टाकत अधिक वेळ घेतला. यामुळेच सामन्यानंतर आयपीएल समितीने आरसीबीचा कर्णधार टु प्लेसिसला दंड ठोठावला.


पुढच्या सामन्यात घ्यावी लागणार काळजी, नाहीतर... 


पहिल्या सामन्यासाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसला 12 लाख रुपये आणि दुसऱ्या सामन्यासाठी विराट कोहलीकडून 24 लाख रुपये दंड म्हणून घेण्यात आले आहेत. आता, आरसीबी संघाने पुढील सामन्यातही हा नियम मोडला तर संघाच्या कर्णधाराला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल. मग संघाचा कर्णधार विराट कोहली असो किंवा फाफ डू प्लेसिस त्यावर एका सामन्यासाठी बंदी घातली जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Virat Kolhi IPL : बॅट चालली नाही, सामना गमावला आणि आता लाखोंचा दंड... कोहलीच्या अडचणीत वाढ