Jahnavi Killekar : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) नुकतंच सोशल मीडियावर एक खास रील शेअर केलं आहे, ज्यामध्ये ती सुपरहिट मराठी चित्रपट सैराटमधील 'सैराट झालं जी' (Sairat Zaala Ji) या लोकप्रिय गाण्यावर रोमँटिक अंदाजात नृत्य करताना दिसते आहे. जान्हवीच्या या रीलला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. तिच्या नाजूक अदा आणि मोहक नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जान्हवीचं रील सोशल मीडियावर चर्चेत, लाईक अन् कमेंट्सचा पाऊस
रीलमध्ये जान्हवीने साधा पण आकर्षक पेहराव केला असून, तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरची सहजता चाहत्यांना विशेष भावली आहे. 'सैराट झालं जी' या गाण्याच्या पार्श्वभूमीवर तिने केलेला डान्स सोशल मीडियावर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अनेकांनी तिच्या या रीलवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जान्हवीने याआधीही आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांचे मन जिंकले आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
जान्हवीने अनेक मालिकांमध्ये साकारलीये महत्त्वाची भूमिका
जान्हवीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2013 साली 'रुंजी' या स्टार प्रवाहवरील मालिकेतून केली. त्यानंतर तिने 'श्री गुरुदेव दत्त' (2019) या मालिकेत लक्ष्मी मातेची भूमिका साकारली.'भाग्य दिले तू मला' या कलर्स मराठीवरील मालिकेत सानिया या खलनायिकेच्या भूमिकेतून तिला विशेष ओळख मिळाली. याशिवाय, 'राधा प्रेम रंगी रंगली', 'फुलपाखरू' आणि 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकांमध्येही तिने काम केले आहे .
जान्हवीने 'बिग बॉस मराठी 5' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चर्चेत आली होती. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असून, तिच्या अभिनय, नृत्य आणि वैयक्तिक आयुष्यातील क्षणांचे अपडेट्स ती नियमितपणे शेअर करते. तिच्या इंस्टाग्रामवर सुमारे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या