Shenaz Treasury Diagnosed With Prosopagnosia : इश्क विश्क (Ishq Vishk) चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री शेनाज ट्रेजरी (Shenaz Treasury) सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेनाज ट्रेजरी ही चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. पण शेनाज ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. शेनाज ही ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. वेगवेगळे फोटो शेनाज सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच शेनाजनं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिनं प्रोसोपॅग्नोसिया या आजाराची माहिती नेटकऱ्यांना दिली. शेनाज ही प्रोसोपॅग्नोसिया या गंभीर आजाराचा सामना करत आहेत.
शेनाजची पोस्ट
शेनाजनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं की, ती प्रोसोपॅग्नोसिया 2 या आजारानं ग्रस्त आहे. पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'मला आत्ता कळालं की, मी लोकांचे चेहरे का ओळखू शकत नाहीये. मी प्रोसोपॅग्नोसिया 2 या आजारानं ग्रस्त आहे. या आजारामुळे लोकांचे चेहरे ओळखता येत नाहीत. मला या गोष्टीची लाज वाटत होती की मी लोकांचे चेहरे नाही ओळखू शकत. मी त्यांचा फक्त आवाज ओळखू शकते. '
शेनाजनं सांगितली लक्षणे
शेनाजनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये प्रोसोपॅग्नोसिया या आजाराची लक्षणं देखील सांगितली आहेत. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही कुटुंबातील व्यक्तींचे किंवा मित्रांचे चेहरे ओळखू शकत नाही. मला लोकांना भेटल्यावर त्यांना ओळखायला काही मिनीटांचा वेळ लागतो.'
पाहा शेनाजची पोस्ट:
शाहिद कपूरसोबत शेनाजनं केलं काम
शेनाज सध्या ट्रॅव्हल ब्लॉगिंग करते. इश्क विश्क या चित्रपटामध्ये शेनाजनं अभिनेता शाहिद कपूरसोबत काम केलं. त्यानंतर उमर, आगे से राइट, रेडियो, लव का द अँड आणि डेली बैली या चित्रपटांमध्ये देखील शेनाजनं काम केलं आहे. इश्क विश्क या चित्रपटामुळे शेनाजला विशेष लोकप्रियता मिळाली होती.
हेही वाचा:
- Alia Bhatt : 'लग्ना आधीच...'; आलियाच्या प्रेग्नेंसीवर राखी सावंतची भन्नाट रिअॅक्शन
- Pooja Hegde : 'एक काळ असा होता जेव्हा चित्रपट मिळत नव्हते...'; पूजा हेगडेनं व्यक्त केल्या भावना