Isha Keskar: स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी घराघरात पोहोचली कला आणि अद्वैत चांदेकरच्या भन्नाट जोडीमुळे. पण काही दिवसांपूर्वी या मालिकेतील चाहत्यांची लाडकी कला म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकरने प्रकृतीच्या कारणास्तव मालिका सोडली. यामुळे मालिकेच्या TRP वर त्याचा चांगलाच परिणाम झाल्याचा दिसतंय. आता लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिकाच संपणार आहे. दरम्यान अभिनेत्री ईशा केसकरने आपल्या मालिकेच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. आणि caption मध्ये मालिका सोडल्याबद्दल प्रेक्षकांची माफीही मागितलीय.
काय म्हणाली ईशा केसकर?
मालिका बंद होणार असल्याने अभिनेत्री इशा केसकरने मालिकेत काम करतानाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. Video शेअर करत ईशाने लिहिलं, कला... अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून सॉरी... तुम्ही प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहील. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग..." असं तिने म्हटलं. आणि मालिकेत काम करताना चे काही फोटोज व्हिडिओज एकत्र करून एक पोस्ट तिने केली आहे.
इशा केसकरने का सोडली होती मालिका?
अभिनेत्री इशा केसकरने लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सोडल्यानंतर काही दिवसातच मालिका सोडण्याचं खरं कारण एका मुलाखतीत सविस्तर स्पष्ट केलं होतं . ती म्हणाली होती" मी सलग दोन वर्ष काम करत होते. जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी तशीच शूटिंग करत राहिले. पण ती दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. विश्रांती घेतली नाही तर भविष्यात डोळ्याची एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल. 15 ते 20 दिवस मी सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही. त्यामुळे सारासार विचार करून आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच मी मालिका सोडणार असल्याचे टीमला कळवलं होतं" असं इशा केसकरने सांगितलं.