Sunil Pal at KKPK2 Grand Premiere: प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन, अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट सुनील पालने (Sunil Pal) किस किसको प्यार करूं 2 या कॅमेडी चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली होती. त्यावेळीचा सुनील पालचा (Sunil Pal)  एक व्हिडीओ सोशल मिडीयावर (Video Viral On social Media) व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की,  सुनील पालने एकदम साधा असा स्वस्तातला शर्ट घातलेला आहे, डोक्यावर टोपी आहे आणि पायात स्लीपर चप्पल घातलेली आहे, सुनील पालचा हा अवतार पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. त्याच्या या व्हिडीओखाली सोशल मिडीया युजरनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.(Video Viral On social Media) 

Continues below advertisement

काहींनी म्हटलं आहे की, सुनील पालकडे पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की, त्याची परिस्थिती फार वाईट सुरू आहे. यांची परिस्थिती पाहता हे खूप अडचणीत असल्याचं दिसतंय. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करायला हवी. त्यानंतर काही युजरने म्हटलं आहे की, मदत तर सहकारी करतील, पण हा त्यांनाही टीका करून उलटसुलट काहीतरी बोलेल. अशा लोकांची कुणीही मदत करत नाही. याने कुणाशीही चांगले संबंध ठेवले नाहीत, सगळ्यांना शिवीगाळ करतो, स्वतःलाच देव समजू लागला आहे. अशा लोकांची अवस्था शेवटी अशीच होते, अशा कमेंट या व्हिडीओवरती आल्या आहेत. (Video Viral On social Media) 

who is Sunil Pal? कोण आहे सुनील पाल?

सुनील पाल प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन, अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट आहे. ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनचा विजेता असून, तो मिमिक्री आणि स्टँड-अप कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्यानी ‘हम तुम’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सुनील पाल स्टेज शो आणि लाईव्ह परफॉर्मन्ससाठीही प्रसिद्ध आहेत. तसेच, डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या अपहरणाच्या प्रकरणामुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता.