Irina Rudakova-Vaibhav Chavan :   बिग बॉसच्या घरातून इरिना रुडाकोव्हा (Irina Rudakova) आणि वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) ही जोडी बरीच गाजली. सोशल मीडियावरही त्यांच्या जोडीची बरीच चर्चा झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही इरिना आणि वैभव अनेक ठिकाणी एकत्र दिसले. इतकच नव्हे तर अनेक मुलाखतींमध्ये त्यांना त्यांच्या नात्याविषयी विचारणा झाली. पण त्या दोघांनीही नेहमीच त्यांच्यात मैत्रीपलिकडे काहीच नसल्याचं सांगितलं. 


इरिना आणि वैभवच्या नात्याच्या सोशल मीडियावर चर्चा सुरु असतानाच एका व्हिडीओची तुफान चर्चा सुरु झालीये. वैभवने त्याचा आणि इरिनाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यावर त्याने नऊवारी हे गाणं लावलं आहे. यामध्ये इरिना नारंगी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये तर वैभव पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अशा कपड्यांमध्ये दिसत आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत वहिनी पसंत आहे असं म्हटलंय.  


सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स


वैभव आणि इरिनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओवर नुसतं मराठी असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटलं की, आता लग्न करा बाबा तुम्ही... दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की,वहिनी खूप मस्त आहे, लग्न कर भावा हिच्यासोबत...आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, लयं भारी जोडी, खूप भारी दिसता तुम्ही दोघं... लग्न करा... एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आम्हाला हिच वहिनी पाहिजे...


इरिनासोबतच्या नात्यावर वैभवचं भाष्य


एका मुलाखतीदरम्यान वैभवने इरिनासोबतच्या नात्यावर भाष्य करताना म्हटलं की, त्यामध्ये त्याने त्याच्या आणि इरिनाच्या नात्यावर भाष्य केलं आहे. वैभवने म्हटलं की, 'आमचं असं काहीही नाहीये. तिचं तिचं एक वैयक्तिक आयुष्य आहे. माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे. त्यामुळे रिलेशनशिपच्या दृष्टीकोनातून आमचा बॉण्ड झाला आहे, असं काहीही नाहीये. आमचा तो बॉण्ड तयार होत गेला.'आमचा एक खरा बॉण्ड होता. जेवढी खरी मैत्री ठेवता आली तेवढी आम्ही ती ठेवली आणि ही बिग बॉसच्या घरातली एक खूप चांगली गोष्ट घडली आहे. फक्त हे नातं असंच राहावं अशी आमची इच्छा आहे. 






ही बातमी वाचा : 


Abhijeet Bichukale : 'बारामतीची जनता मला निवडून देईलच...',अभिजीत बिचुकलेंनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला