Fahad Ahamad vs Nawab Malik, Anushaktinagar Constituency: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री स्वरा भास्करचे (Swara Bhaskar) पती फहाद अहमद (Fahad Ahamad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात (Sharad Pawar Group) प्रवेश केला. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) त्यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांच्या विरोधात रिंगणात उतरवलं आहे. आज फहाद अहमद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Continues below advertisement

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर फहाद अहमद यांनी एबीपी माझाशी बातचित केली. फहाद अहमद म्हणाले की, "शरद पवार हे खरे चाणक्य आहेत, जे रंधा बिल्ला आले होते, ते फर्जी चाणाक्ष आहेत. ही लढाई खरी राष्ट्रवादी आणि डुप्लिकेट राष्ट्रवादी यांच्यामधील आहे. सुप्रिया सुळे मुंबईत नसल्यामुळे त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या नाहीत. आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे, त्यामुळे पक्षात विरोध थोडाफार चालत असतो." तसेच, पुढे बोलताना त्यांनी नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधला. फहाद अहमद पुढे बोलताना म्हणाले की, "नवाब मलिक जेलमध्ये गेल्यापासून प्रचंड कन्फ्युज झाले आहेत. त्यांनी जनतेला मूर्ख समजू नये. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी चषक नावाची स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेत नशा करताना अनेक मुलं पाहायला मिळाली होती." 

फहाद अहमद यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत कन्हैया कुमारदेखील उपस्थित होते. यंदाची निवडणूक गद्दार आणि वफादार यांच्यामध्ये आहे. ज्यांनी गद्दारी केली, ते महायुतीसोबत आहेत आणि जे प्रामाणिक वागले ते महाविकासाकडेसोबत आहेत, असं कन्हैया कुमार म्हणाले आहेत. पुढे बोलताना भाजपच्या नेत्यांचं वागणं इंग्रजांसारखं आहे. आधी भारतीयांनाच कंपनीच सिईओ बनवायचं आणि त्यानंतर भारतातला सर्व माल लुटून न्यायचा. भाजप देखील असंच करत आहे, आधी कारवाया करतात आणि त्यानंतर त्यांनाच आपल्या सोबत घेतात, असंही कन्हैया कुमार म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

फहाद अहमद यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री स्वरा भास्करही सोबत होती. ती म्हणाली की, एकाच प्रकारच राजकारण करणारे आम्ही सोबती आहोत. आता पती-पत्नी आहोत. 2016 पासून फहाद अनुशक्तीनगरमध्ये राहत आहे. चांगलं राजकारण त्याच्यावतीनं केलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी आभार मानतो, पक्षातील वाद न पाहता त्यांनी योग्य उमेदवार निवडलेला आहे. लाडकी बहिणीच्या माध्यमातून सध्या पैसे पूर्ण चालू आहेत. मात्र, लोकांच्या ज्या प्रमुख मूळ गरजा आहेत, त्या पूर्ण केलेल्या नाहीत. नवाब मलिक आणि सना मलिक यांनी त्यांच्या लोकांसोबत गद्दारी केलेली आहे जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असं स्वरा भास्कर म्हणाली.