International Womens Day 2021 Web Series दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च या दिवशी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र हे सारं काही आवरतं असणार आहे. यामागं कारण ठरत आहे ते म्हणजे कोरोनाचं सावट. कोरोना विषाणूचा वाढता विळखा पाहता यंदा अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरीही हरकत नाही. कारण, ऑनलाईन माध्यमांतून तुम्ही असे काही कलाविष्कार पाहू शकता ज्या माध्यमातूनही महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा केला जाऊ शकतो.
Criminal Justice- Behind Closed Doors क्रिमिनल जस्टीस- बिहाइंड क्लोज्ड डोअर्स
दमदार कथानक अभिनेत्री किर्ती कुल्हारीनं साकारलेली व्यक्तीरेथा ही Disney+Hotstar वर प्रसारित होणाऱ्या वेब सीरिजची मुख्य वैशिष्ठ्य. कथानकाला मिळणारं वळण ही या वेब सीरिजच्या जमेची बाजू ठरत आहे.
International Womens Day 2021 | का साजरा केला जातो महिला दिन, जाणून घ्या यामागची कारणं
वधम
एमएक्स प्लेअरवर प्रसारित होणाऱ्या या फिल्ममध्ये सर्व महिला अधिकारी असणाऱ्या पोलीस स्थानकामध्ये सेवेत रुजू असणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याभोवती आणि एका हत्या प्रकरणाच्या तपासाभोवती कथानक फिरतं. पोलीस खात्यात सेवेत असणाऱ्या महिलांच्या जीवनावर या सीरिजच्या निमित्तानं प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
फ्लेश
Eros Nowच्या या सीरिजमध्ये मानवी तस्करीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं साकारलेली निर्भीड राधा ही भूमिका या सीरिजची जमेची बाजू.
दिल्ली क्राईम
नेटफ्लिक्सवरील ही वेब सीरिज पाहताना एका स्त्रीच्या वेदना तर, दुसऱ्या स्त्रीची तिला न्याय मिळवून देण्यासाठीची तळमळ प्रेक्षकांची दाद मिळवून जाते. या सीरिजमधील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांना न्याय दिला आहे.