Inspector Zende Web Series: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) म्हणजे, निखळ मनोरंजन आणि विनोदाची मेजवाणी. या शोमुळे अनेक कलाकारांना मोठी संधी मिळाली आणि त्यांची नावं दिग्गज कलाकारांसोबत घेतली जात आहेत. अशातच आता या शोमधला एक हरहुन्नरी कलाकार ओटीटीच्या पडद्यावरही झळकणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधल्या लोकप्रिय अभिनेत्याची हिंदी वेब सीरिजमध्ये (Hindi Web Series) वर्णी लागली आहे. 'इन्स्पेक्टर झेंडे' (Inspector Zende) असं या सीरिजचं नाव आहे. 

Continues below advertisement

सत्य घटनेवर आधारित 'इन्स्पेक्टर झेंडे' ही सीरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज होणार आहे. सीरियल किलर चार्ल्स शोभराजला (Serial Killer Charles Sobhraj) पहिल्यांदा पकडणारा मुंबई पोलिसांतील (Mumbai Police) मराठमोळा अधिकारी म्हणजे, इन्स्पेक्टर मधुकर झेंडे. त्यांच्यावरच 'इन्स्पेक्टर झेंडे' ही सीरिज आधारित आहे. या बहुचर्चित सीरिजमध्ये लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयी 'इन्स्पेक्टर मधुकर झेंडे' यांची भूमिका साकारत आहे. तर, जिम सरभ 'स्विमसूट किलर' कार्ल भोजराज या हुशार चोराची भूमिका निभावत आहे.

आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. त्यामध्ये अभिनेते भाऊ कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हे मराठी कलाकार झळकले आहेत. याशिवाय आणखी एक लोकप्रिय चेहरा या पोस्टरवर पाहायला मिळाला. हा अभिनेता म्हणजे, हास्यजत्रा फेम ओंकार राऊत.

Continues below advertisement

मधुकर झेंडेंनी पिस्तुलाच्या कॉर्ड्स वापरून शोभराजला बनवलेलं बंदी

मधुकर झेंडे यांनी 1971 मध्ये पहिल्यांदा शोभराजला अटक केली. त्याकाळी हा मोठा पराक्रम मानला गेला होता. त्यावेळी झेंडेंच्या पराक्रमाच्या सर्वत्र चर्चा होऊ लागल्या. चार्ल्स शोभराज हा आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगार आणि सीरीयल किलर होता, आपल्या युक्तीच्या जोरावर मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला गोव्यात अटक केली होती. त्याच घटनेचा एक आठवणीचा किस्सा असा की, शोभराजला पकडल्यावर त्याला अटक करण्यासाठी झेंडे यांच्याकडे बेड्या नव्हत्या, त्यावेळी झेंडेंनी पिस्तुलाच्या कॉर्ड्स वापरून चार्ल्स शोभराजला बंदी बनवलं होतं. 

दरम्यान, बॉलिवूडमधल्या गुणी कलाकारांच्या यादी सहभागी असणाऱ्या मनोज वाजपेयींच्या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरसोबतच वेब सीरिज कुठे आणि कधी पाहता येणार? हेसुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्रेलर लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं केलं आहे. तर, निर्मिती ओम राऊत आणि जय शिवकरणमणी यांची आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'बाहुबली'मधल्या शिवगामीला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?