'बाहुबली'मधल्या शिवगामीला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
Marathi Actress Gave Voice To Sivagami In Baahubali 2: बाहुबली सिनेमा म्हणजे,भारतातील धमाकेदार कल्ट सिनेमांपैकी एक. सिनेमा रिलीज होऊन इतकी वर्ष उलटली, तरीसुद्धा बाहुबलीची क्रेझ काही कमी झाली नाही.
Continues below advertisement
Marathi Actress Gave Voice To Sivagami In Baahubali 2
Continues below advertisement
1/10
एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली'नं बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले. हा सिनेमा फक्त भारतातच नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही खूप गाजला.
2/10
'बाहुबली'मध्ये प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. या सर्वच पात्रांनी दमदार अभिनय केलेला. पण, त्यापैकी शिवगामीची भूमिका विशेष गाजली.
3/10
शिवगामीची भूमिकाच नाहीतर, तिचे डायलॉग्जही विशेष गाजले. पण तुम्हाला माहितीय का? हिंदीत रिलीज झालेल्या बाहुबली सिनेमातला शिवगामीचा आवाज हा रम्या कृष्णनचा नाहीच.
4/10
कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, हा आवाज प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा आहे. 'बाहुबली' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये शिवगामी पात्राला एका मराठी अभिनेत्रीनं आवाज दिला आहे. तिचं नाव, मेघना एरंडे.
5/10
नुकतंच एका मुलाखतीत बोलताना मेघना एरंडेनं स्वतः याबाबत खुलासा केला आहे. तसेच, त्यावेळी आलेल्या अनुभवाबाबतही सांगितलं.
Continues below advertisement
6/10
डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखली जाणारी मेघना एरंडे सिनेमांव्यतिरिक्त अनेक कार्टुन्सलाही आवाज देते. त्यासोबतच तिनं मालिकेतील आणि सिनेमातील पात्रांनाही आवाज दिला आहे.
7/10
नुकतंच तिनं आरपार या ऑनलाईन युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात तिनं तारक मेहता का उल्टा चष्मा आणि बाहुबलीतील शिवगामी पात्रासाठी केलेल्या डबिंगचा अनुभव शेअर केला.
8/10
"'तारक मेहता का उल्टा चष्मा'चं जे टायटल साँग आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा टप्पू येतो आणि म्हणतो प्रॉब्लेम है? सोल्यूशन है.. मग ती दया आणि मिसेस हाथी बोलायला लागतात, काम दिन रात करवाती मेरी सास है... मग ती सास म्हणते ठीक से साफ करो वगैरे असे, एक पाच सहा आवाज आहेत... तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये. आणि मग 'तारक मेहता का उल्टा चष्मा' वगैरे असं ते तर ते सगळे आवाज माझे आहेत.", असं मेघना एरंडेनं सांगितलं.
9/10
"शिवगामीला अष्टदिगपाल को साक्षी कर आपने जो दो वर दिये थे उसे ही तो मांग रही हू महाराज... वगैरे असं आणि मग प्रवीण त्यांनी मला असं सांगितलं होतं की, तू लक्षात घे तिचे दोन्ही काळ वेगळे आहेत. एकामध्ये ती आई आहे. एकामध्ये ती आजी आहे. तर तेव्हा त्यांनी मला थोडंसं तरुण साउंड हो असं सांगितलं...", असं मेघना एरंडेनं सांगितलं.
10/10
पुढे बोलताना मेघना एरंडेनं सांगितलं की, "दुसऱ्यामध्ये आणि मला वाटतंय एवढं त्या अॅक्चुअल बाहुबलीमध्ये पण विचार केला गेला असेल, तर माहिती नाही मला पण... त्यांचं वर्किंग बघ ना दिग्दर्शक म्हणून... इथे ती आजी आहे ना आणि इथे तिची आई, तिचं वात्सल्य तिची करुणा हे दाखव आणि इथे तिचा उद्वेग, तिला झालेला त्रास, तिची मानहानी हे दाखव. म्हणजे एक दिग्दर्शकसुद्धा तुझ्या आवाजाचे किती पटलं बदलू शकतो. याचं मला खरं जिवंत उदाहरण म्हणजे, प्रवीणजीनी जे केलं ते..."
Published at : 25 Aug 2025 11:19 AM (IST)