Team India Title Sponsor : आशिया कप 2025 सुरू होण्याच्या अगदी आधीच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डासमोर मोठं प्रायोजकत्व संकट उभं राहिलं आहे. ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी घालणाऱ्या कायद्यामुळे टीम इंडियाचा विद्यमान टायटल स्पॉन्सर ड्रीम-11 ने माघार घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीही स्पष्ट केलं आहे की बोर्ड आणि ड्रीम-11 यांच्यातील करार मध्येच रद्द करण्यात आला आहे आणि पुढे अशा कंपन्यांबरोबर कोणताही करार होणार नाही. अशा परिस्थितीत आता बीसीसीआयसमोर आशिया कपपूर्वी नवीन स्पॉन्सर शोधण्याचं आव्हान आहे. या प्रकरणात तब्बल 65 हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या एका मोठ्या कंपनीचं नाव पुढे आलं आहे.

Continues below advertisement


करार मध्येच रद्द


9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या अवघ्या दोन आठवडे आधी बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांनी करार संपवण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये सुरू झालेला हा करार तीन वर्षांसाठी म्हणजे 2026 पर्यंत होता. मात्र, नव्या ऑनलाईन गेमिंग कायद्यामुळे ड्रीम-11 कंपनीला या डीलमधून माघार घ्यावी लागली. बीसीसीआयलाही स्पष्टपणे सांगावं लागलं की अशा कंपन्यांशी आता कोणताही करार शक्य नाही.






टोयोटाची एन्ट्री


या निर्णयाचा थेट परिणाम असा होणार आहे की आशिया कपमध्ये टीम इंडिया कदाचित प्रायोजकाविना मैदानात उतरेल. पण दरम्यान, जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा ने टीम इंडियाच्या प्रायोजकत्वात रस दाखवला आहे. वृत्तानुसार, जपानी कार कंपनी टोयोटा भारतीय संघाची टायटल स्पॉन्सर बनण्यास इच्छुक आहे. भारतात ही कंपनी टोयोटा किर्लोस्कर टोयोटा किर्लोस्कर (Toyota Kirloskar) ने कार्यरत असून मागील आर्थिक वर्षात तिने 56,500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.


बीसीसीआयसाठी मोठा निर्णय 


इतक्या मोठ्या कंपनीने रस दाखवल्यामुळे बीसीसीआयकडून यावर गांभीर्याने विचार होण्याची शक्यता आहे. नुकतीच टोयोटा इंग्लंड क्रिकेट संघाची टायटल स्पॉन्सर झाली होती, तर यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाशीही जोडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटाशिवाय आणखी एक मोठी फिन-टेक कंपनी देखील टीम इंडियाशी जोडण्याची इच्छा व्यक्त करत आहे, मात्र तिचं नाव अद्याप गुप्त आहे.


आता बीसीसीआय कोणत्या कंपनीशी करार करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र, आशिया कपमध्ये टीम इंडियाला प्रायोजकाविना खेळण्याची वेळ येऊ नये यासाठी बोर्डाने लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे.


हे ही वाचा -


Sachin Tendulkar : 'आता आधार कार्ड पाठवू का?' व्हॉईस नोट पाठवा म्हणणाऱ्या यूजरची सचिन तेंडुलकरकडून एका वाक्यात विकेट