Solapur Crime: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. 11 वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रसिक बनसोडे असे असून, सध्या त्याच्यावर धाराशिव (Dharashiv) येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Continues below advertisement

Solapur Crime: स्टम्पने मारहाण, तीन तास छळाचा आरोप

पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडे याने दिलेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून त्याला स्टम्पने मारहाण केली. “तब्बल तीन तास मला मारहाण करण्यात आली,” असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.

Solapur Crime: काम करण्यास नकार दिल्याने मारहाण

रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचा पीडित मुलाचा आरोप आहे.  या घटनेने आणखी गंभीर वळण घेतले असून, याआधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले असल्याचा दावा पीडित विद्यार्थ्याने केला आहे. इतकेच नव्हे तर, “महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे,” असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालक वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. 

Continues below advertisement

Solapur Crime: तीन वर्षाच्या चिमुकल्याची आईच्या प्रियकराने केली हत्या

दरम्यान, सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. तीन वर्षांचा फरहान जाफर शेख याची त्याच्या आईच्या प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असून, त्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

आई शहनाज आणि आरोपी मौलाली यांचे विवाहबाह्य संबंध होते. 11  डिसेंबरच्या रात्री फरहान झोपलेला असताना कपडे खराब झाल्याच्या कारणावरून रागाच्या भरात आरोपीने मारहाण करून गळा दाबला. नंतर फरहान खाली पडून जखमी झाल्याचे खोटे सांगून त्याला विजयपूरला नेण्यात आले. मात्र एसटी स्टँडवर आरोपी पळून गेला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी फरहानचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनात गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. घटना सोलापुरात घडल्याने प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nanded : राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्षनेत्याचं अपहरण अन् मारहाण; अजितदादांच्या आमदारावर थेट आरोप, सात जणांना अटक