Monalisa and Farman Khan Press Conference: महाकुंभ मेळ्यातून (Mahakumbh) प्रकाशझोतात आलेली इन्फ्लुएंसर मोनालिसा (Monalisa) सध्या अडचणीत सापडली आहे. तिनं अलिकडेच फरमान खानसोबत (Farman Khan) लग्न केलं. तेव्हापासून तिला नेटकऱ्यांनी धारेवर धरलं. मुख्य म्हणजे मोनालिसाच्या कुटुंबाला तिनं फरमानसोबत केलेलं लग्न आवडलेलं नाही. कपलच्या वैवाहिक जीवनात अशांतता पसरली आहे. त्यांच्या प्रेमाला लव्ह जिहाद असं नाव देण्यात आलं आहे.  देशभरातून त्यांना  जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे.  धक्कादायक म्हणजे, मोनालिसाचे आई - वडील आणि सनोज मिश्रा यांनी फरमानविरोधात लव्ह जिहादची  तक्रार दाखल केली आहे. त्यांनी फरमानवर  मोनालिसाला फसवल्याचा आरोप केला आहे.

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी मोनालिसाने एक व्हिडिओ शेअर केला होता.  ज्यात तिनं मदतीची मागणी केली होती.  दरम्यान, नुकतंच  दोघांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. फरमानने स्पष्टपणे, 'मी आतंकवादी नाही' असे सांगितले आहे. फरमानने सांगितले की, 'लोक मला आतंकी बोलत आहेत. जगाला माहित आहे, मी कोण आहे. मी एक लहान कलाकार आहे.  असं आमच्यासोबत करु नका.  देशात या कारणामुळे आग लावू नका.  या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका'.

'लोक माझ्यावर खोटे आरोप लावत आहेत.  मला माझं गाव ओळखतं. मी कोण आहे, ते माझ्या गावातील लोकांना ठाऊक आहे.  मी लहानपणापासून आर्य समाजात होतो.  तिथे मी पुजा, चक्रासन करत होतो. सगळ्यांना माझ्याबद्दल ठाऊक आहे',  असं फरमान म्हणाला. 'माझी एकच चूक आहे की  मी मुस्लिम कुटुंबात जन्म घेतला, आणि माझं नाव फरमान आहे. या कारणामुळे लोक मला चुकीचे समजत आहेत.   आम्हाला जीवे मारण्याची धमकी  मिळत आहे', असंही फरमान म्हणाला.

Continues below advertisement

'प्रेम करणं हे चुकीचं आहे का?  जर लोकांनी सुखाने आम्हाला जगू दिलं नाही. तर, आम्ही सुसाइड करु. आमच्याकडे पैसे सुद्धा नाहीत. पैशांशिवाय आम्ही कसे जगणार? जर आम्ही काम केलं नाही तर, खाणार काय?  लोक आमच्या मागे लागले आहेत', असं फरमान म्हणाला. 'माझा श्री गुरुजींवर विश्वास आहे.  आमचं लग्न त्यांच्या मंदिरात झालं.  आम्ही  एक धर्म, एक जाती आणि एक इश्वरचं पालन करतो.  कुणीही त्यांच्या मंदिरात जाऊन पुजा किंवा लग्न करायला जाऊ शकतो', असंही फरमानने स्पष्ट केलं.

'लग्नात मोनालिसाचे अर्धे कुटुंब आमच्यासोबत होते. आमच्या लग्नानंतर मोनालिसाच्या आईचा फोन आला होता.  त्यांनी आम्हाला घरी परत न येण्यास सांगिते. मोनालिसाच्या  कुटुंबावर सनोज मिश्राचा दबाव आहे', असंही फरमान म्हणाला.