Yuzvendra Chahal and Dhanshree Verma : क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanshree Verma) सध्या सोशल मीडियावर (Social Media) खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, दोघांनीही यावर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. याउलट दोघांनी घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करणं कटाक्षानं टाळलं आहे. तसेच, युजवेंद्रसोबत लग्न फक्त आणि फक्त फेम मिळवण्यासाठी धनश्रीनं केल्याचा आरोप केला जात आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केल्या, पण त्या पोस्टमध्ये एकमेकांची नावं घेणं आवर्जुन टाळलं. तसेच, सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केलं आहे. युजवेंद्रनं तर धनश्रीचे फोटोही अकाउंटवरुन डिलीट केले आहेत. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळं राहत आहेत. दोघांच्याही घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. धनश्रीनं अत्यंत मोठी रक्कम पोटगी म्हणून मागितली आहे, त्यामुळेच घटस्फोटाचं प्रकरण अडकल्याची माहिती मिळत आहे. यजुवेंद्र चहलकडून धनश्रीनं पोटगी म्हणून तब्बल 60 कोटी रुपयांची पोटगी मागितली आहे. पण, युजवेंद्रनं एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला आहे. यामुळेच त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण रखडल्याची माहिती मिळत आहे. 


2023 मध्ये धनश्रीनं हटवलेलं युझीचं आडनाव 


धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केल्या पण घटस्फोटाबाबत काहीही बोलणं किंवा एकमेकांचं नाव घेणं कटाक्षानं टाळलं. तसेच, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 2023 मध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. 2023 मध्ये धनश्रीनं आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन स्वतःच्या नावापुढे लावलेलं 'चहल' आडनाव हटवलं होतं. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण, युझी चहलनं त्यावेळी जाहीरपणे या सर्व चर्चा अफवा असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता काही दिवसांपूर्वी धनश्री आणि चहलनं एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. ज्यामुळे पुन्हा एकदा जोडप्याच्या घटस्फोट झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 


दरम्यान, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 2020 मध्ये लग्न केलं. अजुन दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली नाहीत, तोवरच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल हे सोशल मीडियावर कायमच एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मात्र, अनेक दिवसांपासून दोघे साधे स्पॉट देखील झाले नाहीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला