IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमचं नामकरण कधी झालं? तसेच या स्टेडियमवर आतापर्यंत किती सामने खेळण्यात आले? या सामन्यात प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाला किती फायदा झाला? याव्यतिरिक्त नरेंद्र मोदी स्टेडियमशी जुडीत इतर महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
नामकरण
दरम्यान, 24 फेब्रुवारी 2020 रोजी मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून नरेंद्र मोदी स्टेडियम असं नामकरण करण्यात आलं. हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह अंतर्गत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता 1 लाख 32 हजार इतकी आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सर्वोच्च धावासंख्या
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 14 कसोटी, 27 एकदिवसीय, 6 टी-20 आणि 18 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. आयपीएलच्या 18 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 सामने जिंकले आहेत. या स्टेडियममधील र्वोच्च धावसंख्या 201 इतकी आहे. तर, 102 सर्वात कमी धावसंख्या आहे.
आंतरराष्ट्रीय सामने
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना 28 डिसेंबर 2012 रोजी झाला. ज्यामध्ये भारतानं पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर 9 वर्षांनंतर येथे कोणताही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. 2021 मध्ये या स्टेडियमवर पाच टी-20 सामने खेळले गेले. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीनदा विजय मिळवला आहे आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं दोनदा विजय मिळवला आहे.
हे देखील वाचा-
- IPL Final: आयपीएलच्या समारोप सोहळ्यात चमकणार बॉलिवूड तारे; कार्यक्रमाची वेळ, प्रमुख पाहुण्यांची यादी आणि इतर माहिती
- IPL 2022 Final, GT vs RR: अंतिम सामन्यात दवाचा प्रभाव जाणवणार? कोणासाठी अनुकूल असेल खेळपट्टी? पाहा पिच रिपोर्ट
- हार्दिक पांड्या- संजू सॅमसन आमने-सामने, इतिहास रचण्यासाठी उतरणार मैदानात, अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन?