Vicky-Katrina Marriage Pics : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला.
कतरिनाने लग्नात गडद गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. तर विकी कौशलने लग्नात फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. कतरिनाने केसात गजरा माळला होता. कतरिना आणि विकी 12 डिसेंबरपर्यंत सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. विकी कौशलने नुकतेच लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत.
कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा होता समावेशकतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. लग्नाला येण्यासाठी पाहुण्यांना खास निमंत्रण कोड देण्यात आला होता. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली होती. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नव्हता.
संबंधित बातम्या
Katrina-Vicky Wedding Pics : कतरिना कैफ-विकी कौशलचा असाही विक्रम; लग्नाच्या फोटोंना केवळ 20 मिनीटात 10 लाख लाईक्स
Vicky Kaushal Katrina Kaif Wedding : शुभमंगल सावधान! कतरिना-विकी अखेर लग्नाच्या बेडीत
Google Most Searched Indian Film : या वर्षी नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केलेला सिनेमा, गुगलने जाहीर केली यादी
[yt]