Ikkis Director Shriram Raghavan On Dhurandhar: अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 'धुरंधर'नं (Dhurandhar Movie) बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवलं आहे. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होतंय. अनेकजण दिग्दर्शक आदित्य धरवर (Aditya Dhar) कौतुकाचा वर्षाव करतायत. पण, एक असा बॉलिवूड दिग्दर्शक (Bollywood Director) आहे, ज्यानं मात्र 'धुरंधर' हा माझ्या टाईपचा सिनेमा नसल्याचं म्हटलंय. बरं हा दिग्दर्शक एवढ्यावरच थांबला नाहीतर, त्यानं त्याला आदित्य धरची शैली अजिबात फॉलो करायची नाही आणि 'धुरंधर'सारखा सिनेमा बनवणं हे मूर्खपणाचं काम असेल, असंही म्हटलं आहे. 

Continues below advertisement

'धुरंधर'च्या विरोधात बोलणाऱ्या दिग्दर्शकाचं नाव आहे, श्रीराम राघवन (Sriram Raghavan). यांनी दिग्दर्शिक केलेला 'इक्कीस' नव्या वर्षात रिलीज केला जाणार आहे.  'द हिंदू' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान श्रीराम राघवन यांना विचारण्यात आलं की, 'धुरंधर' आणि त्यांचा भाऊ श्रीधर राघवन यांनी बनवलेल्या स्पाय चित्रपटांमध्ये नेमका काय फरक आहे? याचं उत्तर देताना श्रीराम राघवन म्हणाले की, "हा एक उत्तम चित्रपट आहे, ज्यामध्ये कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. परंतु तो आमच्या प्रकारचा चित्रपट नाही..."

'इक्कीस' सिनेमाचे दिग्दर्शक  श्रीराम राघवन म्हणाले की, "आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की, आपण एका वेगळ्या युगात राहतो. शॉन कॉनरी आणि रॉजर मूर अभिनित जेम्स बाँडचे सुरुवातीचे चित्रपट मनोरंजक होते. नंतर बाँडचे चित्रपट अधिक गंभीर झाले. 'धुरंधर' हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. तो बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि करायलाही हवा. पण तो एकमेव फॉरमॅट नाही. जर मी त्याचं अनुकरण केलं तर ते करणं सर्वात मूर्खपणाचं काम ठरेल. आदित्य धर आणि मी राष्ट्रीय पुरस्कारांचं व्यासपीठ शेअर केलं होतं, जेव्हा त्याने 'उरी' हा चित्रपट बनवला होता आणि मी 'अंधाधून' हा चित्रपट बनवला होता. त्याची संवेदनशीलता आणि कलात्मकता वेगळी आहे आणि मला त्याचे चित्रपट पहायला आवडतं. पण त्याच्यासारखे चित्रपट मी बनवणार नाही..."

Continues below advertisement

मुलाखतीत बोलताना श्रीराम राघवन यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. ते म्हणाले की, "धरमजींसोबत अभिनयाचा कोणताही मागमूसच नव्हता. म्हणजे, त्यांचं वर्तन, त्यांची शैली हे सर्व काही त्या पात्राचा भागच होते. ते कथेशी खोलवर जोडले गेले होते. पंजाबमधील त्यांचं घर सोडण्याचं दुःख त्यांच्या मनात वर्षानुवर्षे रुजलं होतं. घरी परतण्याचा विचार त्यांच्यासाठी एक खोल वैयक्तिक अनुभव बनला. त्या पात्रात ते पूर्णपणे बुडाले होते. ते अक्षरशः ते पात्र जगत होते..."

धरमजींबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, "त्यांना संवादांची सखोल समज होती आणि ते कमी शब्दांच्या वापराला अधिक महत्त्व देत होते. मी त्यांना संवाद लिहून दिलं पण ते कसे म्हणायचे याबद्दल ते नेहमी माझा सल्ला विचारायचे. त्यात ते कधी स्वतःहून बदल करायचे आणि चित्रपटात मी त्यांनी सुचवलेल्या अनेक ओळी वापरल्यासुद्धा आहेत. आम्ही अनेकदा त्यांच्या कवितांवर चर्चा करायचो. मला त्यांच्या कविता प्रकाशित करायच्या होत्या, पण त्यांना घाई नव्हती. मी त्यांना चित्रपटासाठी त्यांची एक रचना वाचून दाखवण्याची विनंती केली आणि ते खूप सुंदर होतं..." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'धुरंधर' चित्रपटाबाबत मोठी अपडेट; प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार; पण कधी, कुठे अन् कसा?