Horoscope Today 31 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 31 डिसेंबर (December) 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार बुधवार आहे. हा दिवस आपण लाडक्या गणरायाला (Lord Ganesha) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त गणपती मंदिरात जाऊन गणरायाची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानेही तो खास असणार आहे. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

आज वर्षाचा शेवटचा दिवस मेष राशीसाठी खास असणार आहे. आज दिवसभर तुम्ही उत्साहात असाल. तसेच, आजच्या दिवसात तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. तुमच्या कमाईतून तुम्हाला समाधान मिळेल. तसेच, घरात आनंदाचं वातावरण राहील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. ग्रहांच्या उत्तम संयोगाने तुमचं नशीब उजळणार आहे. तसेच, आज दिवसभर तुम्ही फार उत्साही तसेच रोमॅंटिक अंदाजात असाल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा खर्चिक असणार आहे. आज उत्साहाच्या भरात तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जातील. तसेच, आज तुम्हाला एखाद्या मित्राच्या मदतीने चांगला लाभ मिळेल. दान पुण्य करण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात तुम्ही घालवाल. आज एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही छान वेळ घालवाल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास काहीसा दमवणारा असणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी वर्षाचा शेवटचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमचा वावर अधिक असेल. तसेच, आजच्या दिवसात प्रवासाचे योग आहेत. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही फार पुढे जाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होईल. लहान मुलांसाठी आजचा दिवस फार आनंदात जाईल. तसेच, तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी तुम्ही आज कराल. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांबरोबर घालवाल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सतर्कतेचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या जुन्या चुकांची शिक्षा किंवा तुमचं एखादं सत्य समोर येण्याची चिन्हं दिसतायल. त्यामुळे वेळीच सावध राहा. तसेच, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. मुलांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडे होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही कारणास्तव तुमचा पारा चढू शकतो. मात्र, तुम्ही लगेच शांतही व्हाल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज उत्साहाच्या भरात जास्त पैसे खर्च करु नका. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला नवीन अनुभव घेता येईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित राहील. तसेच, शनिच्या मार्गी चालीचा देखील या राशीवर शुभ परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळे लवकरच अच्छे दिन सुरु होतील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, मानसिक शांतीसाठी चिंतन कराल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा मिळणार आहे. तसेच, शनिची मार्गी चाल असल्यामुळे काही काळासाठी तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होईल. तुमच्या कामावर तुमचं मनापासून प्रेम असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology 2026 : पैसा, प्रसिद्धी आणि नोकरी...2026 वर्ष 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी असणार लकी; वर्षाच्या सुरुवातीलाच जगाल राजासारखं आयुष्य