Dhurandhar Set for Netflix Premiere After Massive Theatrical Success: प्रदर्शित झाल्यापासून धुरंधर (Dhurandhar) चित्रपटाने धुवांधार बॉ़क्स कमाई केली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. रणवीर सिहंसह या चित्रपटात तगड्या कलाकारांनीही प्रमुख भूमिका साकारली. इतरही स्टारकस्टने या चित्रपटात जबरदस्त कामगिरी केली. एकूणच अॅक्शन पॅक फिल्म प्रेक्षकांना भावला. या चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडले. दरम्यान, प्रेक्षकवर्ग आता या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टसाठी उत्सुक आहेत. य चित्रपटाचा दुसरा पार्ट 2026मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रेक्षकांसाठी या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. धुरंधर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांना या चित्रपटाचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे.
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कमाई करत आहे. या चित्रपटातील चित्रीकरण, गाणी एकंदरीत सगळंच भन्नाट होतं. रणवीर सिंहसह या चित्रपटात अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जून प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. हा चित्रपट लवकरच ओटीटी रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धुरंधर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. दरम्यान, ओटीटी रिलीजची संभाव्य तारीखही समोर आली आहे. धुरंधर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 30 जानेवारी 2026ला रिलीज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजाबाबत अधिकृत माहिती अद्याप शेअर केलेली नाही.
धुरंधरची छप्परफा़ड कमाई
धुरंधर हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आतापर्यंत छप्परफाड कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत 690.5 कोटी रूपयांची कमाई केली आहे. दरम्यान, 2025 या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे. दरम्यान, ज्यांना हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता आला नाही, त्यांना हा चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार आहे. दरम्यान, प्रेक्षकवर्ग हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, या चित्रपटाची जादू अजूनही सिनेमागृहात काम आहे. ओटीटीवर आल्यानंतर आपण पुन्हा एकदा हा चित्रपट पाहू शकता.