Disha Vakani : कॉमेडी टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) 2008 पासून छोट्या पडद्यावर प्रसारित होत आहे आणि अजूनही ती प्रेक्षकांची खूप आवडती मालिका आहे. या टीव्ही मालिकेत दिलीप जोशी साकारात असलेल्या 'जेठालाल'पासून अमित भट्ट यांच्या ‘बापूजीं’पर्यंतच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला या मालिकेत 'दया बेन'ची भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकाणीबद्दल सांगणार आहोत.


दिशाने साकारलेली 'दया बेन' ही व्यक्तिरेखा या टीव्ही मालिकेतील लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे. तथापि, ‘दयाबेन’ साकारणारी दिशा 2017 मध्ये प्रसूती रजेवर गेल्यापासून शोमध्ये परतलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दिशा वाकाणीला निर्मात्यांनी अनेकदा संपर्क साधला, पण यश मिळाले नाही. अखेर सीरियलच्या निर्मात्यांनी असेही सांगितले होते की, दिशाला या मालिकेत परत यायचे नसेल, तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' नवीन दया बेनसोबत पुढे जाईल.


कमबॅकची चर्चा


यादरम्यान काही अशा बातम्याही आल्या होत्या, ज्यात दावा करण्यात आला होता की, जर सीरियलच्या निर्मात्यांनी दिशा वाकाणीच्या काही अटी मान्य केल्या, तर ती कमबॅक करण्यास राजी होईल. या अटी दिशाच्या पतीने घातल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.


पती घातल्या ‘या’ अटी!


या अटींनुसार दिशाच्या पतीने अभिनेत्रीला प्रत्येक एपिसोडसाठी दीड लाख रुपये मिळावेत, अशी मागणी केली आहे. यातही दिशा वाकाणी दिवसातून फक्त तीन तास काम करेल आणि तिसरी अट आहे की, दिशाच्या बाळासाठी सेटवर एक नर्सरी असावी, जिथे बाळ आपल्या आयासोबत राहू शकेल. मात्र, आता मालिकेचे निर्माते ही अट मान्य करतात की, साफ धुडकावून लावतात आणि नवीन ‘दया बेन’ला मालिकेत आणतात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha