Mumbai : मुंबईमधील (Mumbai) कुरार पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी संजय दुबे नावाच्या प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्राध्यापकानं 24 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डी फार्मसीला अॅडमिशन देण्याचे आश्वासन देऊन, त्यांची फसवणूक केली. हा शिक्षक आर. के. कॉलेजमध्ये शिकवत होता तसेच त्याचे क्रांती नगर येथे एक मेडिकल सेंटर देखील आहे. हा प्राध्यापक कॉलेजमध्ये फार्मसीचा अभ्यासक्रम मुलांना शिकवत होता. आरोपी प्राध्यापक हा अॅडमिशनचं आश्वासन देऊन विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये घेत होता. एका विद्यार्थ्याकडून या प्राध्यापकानं दोन लाख दहा हजार घेतले होते तर दुसऱ्याकडून यानं सत्तर हजार घेतले. ज्यामध्ये 60 हजार हे त्या शिक्षकाचे कमिशन होते.
सध्या अटकेत असलेल्या या प्राध्यापकाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. आरोपी शिक्षकानं मुंबईबरोबरच मुंबईच्या बाहेरील विद्यार्थ्यांची देखील फसवणूक केली आहे. कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या क्रांती नगर परिसरातील रहिवासी आशीष सरोज जैसवालला आर के कॉलेजमधून फार्मसीचा कोर्स करायचा होता. पण अशीष ला कमी गुण मिळाले. त्यामुळे त्याला अॅडमिशन मिळाले नाही. त्यानंतर आशीषने आर. के. कॉलेजमधील प्राध्यापक संजय केशव दुबेची भेट घेतली. संजयनं आशीषला फार्मसीला प्रवेश देतो, असं आश्वासन दिलं. त्यानंतर संजयनं आशीषला एक लाख सत्तर हजार आणि कॉलेजच्या डिग्रीची ऑरीजनल कॉपी मागितली, त्यानंतर आशीषनं मार्च 2020 मध्ये पूर्ण पैसे आणि कॉलेजची डिग्री संजयला दिली. 2021 मध्ये संजयानं आशीषला सांगितलं, बंगळुरू येथील सूर्या कॉलेजमध्ये त्याचे अॅडमिशन झालं आहे. पण या कॉलेजची दोन वर्ष एकही परीक्षा झाली नाही, त्यामुळे आशीषला त्याची फसवणूक झाली आहे, अशी शंका आली.
कुरार पोलीस स्टेशनच्या टीमनं आशीष आणि इतर काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर संजय दुबेला अटक केली, संजयनं पोलिसांना सांगितलं की, त्यानं प्रत्येक विद्यार्थ्याकडून पैसे आणि ओरिजनल सर्टिफिकेट घेतले, त्याला या कामाचे 60 हजार कमिशन मिळत होते.
फसवणुकचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला बोरिवली न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्याला 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अखेर सांगली बँकेचा 'तो' निर्णय मागे; स्वाभिमानीच्या आक्रमकतेनंतर संचालक मंडळाची माघार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha