Chhaava Movie Box Office Collection : 'छावा' चित्रपटातून (Chhaava Movie) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा आणि पराक्रम रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सध्या हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशा परिस्थितीत 'छावा' बॉक्स ऑफिसवर (Chhaava Box Office Collection) दररोज धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटानं अवघ्या 10 दिवसांत 440 कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याचे सांगितलं जातंय. तर 'छावा'नं (Chhaava) रिलीज होताच अनेक दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
दरम्यान, देशभरात छावा चित्रपटाची घौडदौड सुरू असतांना गेल्या शनिवार-रविवार या वीकएंडला छावा चित्रपट मोठी उसळी घेत अधिक नफा कमवत उच्चांक गाठेल, अशी अपेक्षा होती. मात्र रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही अंशी फटका बसल्याचे दिसून आले आहे. रविवार असून देखील प्रेक्षकांनी शनिवारच्या तुलनेत थिएटरकडे फारशी गर्दी केली नसल्याने चित्रपटाचे रविवारी मात्र मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
दहाव्या दिवशी 'छावा' चित्रपटाने किती केली कमाई?
'छावा' चित्रपटाचं प्रोडक्शन हाऊस असलेल्या मॅडॉक फिल्म्सच्या (Maddock Films) मते, 'छावा' चित्रपटानं पहिल्या दिवशी 33.1 कोटी रुपयांची कमाई करून भारतात बॉक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 39.3 कोटी रुपये कमावले, तर तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला. तर घरगुती बॉक्स ऑफिसवर फिल्मनं 6 दिवसांत एकूण 180.46 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. सोबतच जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत 9 दिवसांत तब्बल 393.35 कोटी रुपये कमावले आहेत. तर हेच आकडे 10 दिवसांत सुमारे 440 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
क्लायमॅक्स पाहून न कळत डोळ्याच्या कडा पाणावतात
'छावा'मध्ये छत्रपती शंभू राजांचं बलिदान, त्यांची शौर्य, पराक्रम आणि त्याग दाखवण्यात आला आहे. 'छावा'मधला क्लायमॅक्स पाहून तर डोळ्याच्या कडा पाणावतात आणि आपला राजा किती पराक्रमी होता, याची जाणीवर करुन देतो. 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. तर, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. तर, साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत बॉलिवूड स्टार अक्षय खन्ना दिसून आला आहे. अशातच यासर्वांव्यतिरिक्त दिव्या दत्ता, आशुतोष राणा आणि विनीत कुमारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.
हे ही वाचा